हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने वसमत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन..!
श्रीकांत बाराहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली :- जिल्हाच्या वसमत शहरात आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे संसद भवनामध्ये केंद्रीय ग्रह मंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते विश्व वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी भाषेत आंबेडकर फॅशन झाले आहे, असा अपमानास्पद उच्चार करून राज्यसभेत संविधान चर्चा संदर्भात वक्तव्य केलं आहे.
त्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे म्हणजे ही एक फॅशन झाली आहे, असं वाटत आहे. अमित शहा यांना कदाचित माहिती नसेल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उच्चार करणे हे आमच्या बहुजनांना दैवत प्रेरित करत असत, अन्याय अत्याचार व दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी बळ देत असते. आणि मनुवादी विचाराच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी आम्हाला एकत्रित करीत असते.
आंबेडकर हे नाव नसून आंबेडकर म्हणजे लढवय्या पणाचा दैदीप्यमान धगधगणारा ज्वलंत आणि आम्हा बहुजनांना सदा सर्वकाळ प्रेरित करणारा प्रेरणेतेचा आदर्शाचा अखंड स्रोत आहे. असे वक्तव्य यावेळी सुभाष मस्के व राजकुमार येंगडे यांनी या वेळी बोलतांना केलं, ते पुढं असे ही म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अपमान व अवहेलना करणाऱ्या अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, असे देखील वक्तव्य यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. यावेळी संजय खंदारे, राजकुमार येंगडे, सुभाष मस्के सर, यशवंतराव उबारे, आनंदराव करवंदे, गौतम पारखे सर, विश्वनाथ खंदारे, दीपक भिसे, अरविंद कठाळे, देवानंद जाधव, दिनेश बुजवणे, राजेंद्र तरकसे, संदीप शेळके, महेश भारशंकर, दादाराव जाधव, व तान्हाजी गायकवाड, यांचे सह या निवेदनावर आदी अनेक समाज बांधवानी स्वाक्षऱ्या करून निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात वसमत येथे देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या