Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवशंकर बझार मध्ये तांदुळ महोत्सवाच्या उद्घाटन ; 80 प्रकारचे तांदुळ विक्रीस उपलब्ध


चित्रा न्युज प्रतिनिधी
 सोलापूर :-अकलूज  येथील शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेच्या शिवशंकर बझारमध्ये तांदूळ महोत्सवास उत्साहात सुरूवात झाली. 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हा.चेअरमन मदन भगत, संचालक जगन्नाथ धुमाळ, नारायण फुले, कैलास ताटे, अनिल मुंडेफणे, व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख उपस्थित होते.

उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या ध्येय धोरणानुसार ग्रामीण भागात गेल्या 29 वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर सामाजिक बांधिलकी जपत शिवशंकर बझार सहकारी तत्वावर कार्यरत आहे.  प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणारा  तांदुळ महोत्सव शिवशंकर बझारचे प्रमुख आकर्षण असते. माळशिरस तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील  चोखंदळ व खवय्ये ग्राहक अवर्जुन या तांदूळ महोत्सवाला भेट देतात.

यावर्षीच्या तांदुळ महोत्सवामध्ये 80 प्रकारच्या विविध नामांकित कंपनींचे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय ग्राहकांच्या सोईकरीता विविध प्रकारच्या डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सौंदर्यप्रसाधने ज्वेलरी आयटमवर 25% डिस्काउंट, फुटवेअर शुज वर 25% डिस्काउंट, तसेच टॉप लेडीज प्लाजोवर 25% डिस्काउंट देण्यात येत आहे.

 हा तांदूळ महोत्सव व डिस्काउंट ऑफर 31 मार्चपर्यंत चालू राहणार असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या