चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-अल्पवयीन,ना-बालक असलेले मुलं वाहन चालविताना आढळली तर त्या चालकावर व त्याच्या पित्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करीत असल्याची न्यूज, बातमी विविध दैनिकातुन वाचण्यात येतात.
माञ,उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे रोज शेकडो अल्पवयीन मुले दु चाकी बाईक "धुम स्टाईल" पळवित असल्याचे सामान्य जनतेला दिसते. पण संबंधित यंञणेला दिसत नाही. याचे आमआदमीला नवल वाटते.व याकडे प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष होत असल्याचे बघुन हाळी-हंडरगुळी हे2 गावं लातुर जिल्ह्यात नाहीत,का?हा प्रश्न सुज्ञ जनतेतुन प्रशासनाला विचारला जात आहे.
मोठ्या रुबाबात,गर्वात आपल्या लाडक्या लेकरांना जे की अल्पवयीन आहेत,अशांना गाडी चालवायला देणा-या पालकांना आता कायद्याचा "हाबाडा" बसू शकतो.कारण,लातुर पोलीस विभागातर्फे विविध ठाण्याचे हद्यीत अल्पवयीन चालकांवर आणी त्यांच्या पालकांवर कारवाईचा "दट्टा" चालविण्यात येत आहे.आणी अनेक पालकांवर गुन्हे ही दाखल होताहेत. गत वर्षात जिल्हाभरात वाहतूक नियमांची "ऐशी की तैशी" करणा-या अंदाजे 40 एक हजार वाहनांवर कारवाई केल्याचे उघड झाले आहे. माञ,वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हंडरगुळी बीट मध्ये एकाही अल्पवयीन चालकावर व त्याच्या पित्यावर कारवाई केली नाही.यामागचा "अर्थ" काय.हे एक कोडेच जनतेला पडले आहे.
वाहन चालवायचे वय नाही तरी पण वाढवणा पोलीस ठाणे व हंडरगुळी बीट अंतर्गत असलेल्या हाळी गावात रोज शेकडो अल्पवयीन पोरं बाईक चालवतात ते पण वाहतुक नियम पायदळी तुडवुन "धुम स्टाईल" !!
व हा सगळा "खेळ" सामान्य हाळी- हंडरगुळीकरांना दिसत असलातरीही प्रशासनाला दिसत नसल्याने लहान मुलं बेभान होऊन ट्रीपल सीट्स गाडी चालवितात.संबंधित विभागाने घोषित केल्याप्रमाणे येथील शाळेत जाणा-या 10/12 वर्षाचा शाळकरी पोरांना बाईक चालविण्याचा रितसर परवाना एम.एच.55 आरटीओ खाते उदगीर यांनी दिलाय का?
*रस्ते सुरक्षा सप्ताह* हे अभियान राबविणा-यांना येथे रोज वाहतुकीचे नियम पायदळी तुडवित बाईक चालविणारे अल्पवयीन चालक/पोरं दिसत नाहीत,का?
*वाहतुक नियमांची ऐशी की तैशी* करणा-या अल्पवयीन चालक व त्यांच्या पित्याविरोधात गुन्ह्यासह आर्थीक दंडाची कारवाई लातुर जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत करीत असल्याचे वाचण्यात येते.पण वाढवणा ठाणे व हंडरगुळी बीट अंतर्गत अद्यापपर्यंत कारवाई करण्याची "डेअरींग" कोणी पण केली नाही.म्हणुन येथे रोज शेकडो पोरं वेड्यावाकड्या स्टाईल मध्ये बाईक चालवताना दिसतात.व असे वाहन चालविणा-या शाळकरी पोरांवर व त्यांना मोठ्या थाठामाठात बाईक देणा-या "बापा"वर कारवाई होत नसल्याने हे 2 गावं जिल्ह्यामध्ये नाहीत,का?असा प्रश्न चर्चीला जातो.


0 टिप्पण्या