चित्रा न्युज ब्युरो
लातूर :- विद्यार्थी वाहतुकीसाठी परवाना असलेली स्कुल बस शाळा,काॅलेज यांना बंधनकारक आहे.माञ,उदगीर तालुक्यातील सर्वात जुनी शिक्षण संस्था असलेल्या हंडरगुळी येथील 1 उच्च माध्यामिक विद्यालयाकडे गत कित्येक वर्षापासुन स्कुल बस नाही. तरीही या ज्यू.काॅलेजचे मॅनेजमेंन्ट परवाना नसलेल्या व गुरांची वाहतूक करणा-या वाहनांतुन विद्यार्थ्यांची ने- आण करतात.व अशा वाहनांचा अपघात झाल्यास त्यातील मुला — मुलींना "छदाम" ही मिळेना.तरीही खाजगी वाहनांतुन स्व:ताचे जीव की प्राण असलेल्या "लेकरांना" पालक वर्ग पाठवितातच कसे? पालकांचे आपल्या "लेकरांवर प्रेम" नाही का? तसेच काल परवा लातुरात घडला तसा अपघात घडल्यावरच संबंधित पालकांचे व अधिका-यांचे खाडकन डोळे उघडतील का?असे प्रश्न हाळी हंडरगुळीतील शिक्षणप्रेमीं संबंधित प्रशासनाला विचारत आहेत.तसेच याबाबत विचारना केलो असता संबंधित अधिका-याला कारवाई करायला सांगतो असे एआरटीओ आशिषकुमार अय्यर यांनी म्हणुन 15 दिवस झालेत.तरीही कारवाई शुन्यच ! तसेच याबाबत त्या शाळेला नोटीस व ताकीद देऊ असे पंचायत समिती शिक्षणविस्तार अधिकारी नितीन लोहकरे यांनी म्हणुनही 15 दिवस झाले तरीही त्या शाळेतील गाडीला,अॅटोला शालेय विद्यार्थी वाहतूकीचा कसलाच परवाना नसलेल्या "ट्रॅव्हल्स" व "मॅजीक" नामक गाडीवर कारवाईचे "धाडस" कुणीही दाखविले नाही.म्हणुन विद्यार्थी वाहतूकीचा परवाना नसलेल्या खाजगी वाहनांमधुन येथून जवळच्या वडगाव एक्की, बोरगाव बू. (ता.चाकुर) व खरबवाडी {ता.अहमदपुर} तसेच चिमाचीवाडी या व अन्य गावातील दररोज शेकडो विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक होत असल्याचे जनतेला दिसत आहे. माञ,अधिका-यांना सांगुनही दिसत कसे नाही? तसेच त्या पालकांचे "प्रेम" स्व:ताच्या मुलांवर नसल्याने आणि संबंधित आरटीओ व शिक्षण खात्यातील संबंधीत अधिका-यांच्या - च मदतीने, आर्शिवादाने व बनवाबनवीनेच अशी वाहने चालत असल्याची चर्चा,शंका हंडरगुळीतील शिक्षणप्रेमींत आहे.
कायदा पायदळी तुडवीत आणी नियम ढाब्यावर
बसवित खाजगी विनापरमीट वाहणांतुन विद्यार्थ्यांची बेशिस्तीत व जीवघेणी वाहतूक खुले आमपणे होत असुनही या अतिशय गंभीर विषयाकडे परिवहन व शिक्षण अधिकारी हे लक्ष देऊन कार्यवाही का करीत नाहीत?त्यांचे हात=पाय कुणी बांधले? का एखादा गंभीर अपघात व्हावा आणि मगच आपण कार्यवाही करावी,अशी ईच्छा शिक्षन व आरटीओ अधिका-यांची आहे का असे प्रश्न या निमित्ताने चर्चेत आहेत.
समिती कागदावर असल्याची शंका आहे. कारण, जिल्हा, तालुका व शालेयस्तरावर स्कुलबस संदर्भात समिती असते.आणि ही समिती दर 2 महिण्याला बैठक घेत असते.परंतू, हि समिती अस्तित्वातच आहे की नाही?याची शंका येते.कारण,अशी कोणती समिती या गाव व तालुका पातळीवर असती तर गत कित्येक वर्षापासुन विद्यार्थ्यांचा जीव "डेंझर झोन" मध्ये घालुन होणारी ही अवैध विद्यार्थी वाहतूक झालीच नसती. यामुळे गाव ते जिल्हापातळीवर असलेली ही समिती कागदावर आहे. असे येथील बोगस स्कुलबस बघून म्हटले जाते.
रंग पिवळा,नियम डावला..!असा प्रकार स्कुलबस बाबत घडत आहे.कारण,टी.पी.असलेली आणि विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेली खाजगी ट्रॅव्हल्स मधून आजुबाजुच्या गावातील शेकडो मुल,मुलींची अवैधरित्या वाहतुक होत आहे.तर पिवळा रंग असलेल्या कांही ट्रॅव्हल्स मधूनही नियमबाह्य विद्यार्थ्यांची वाहतूक होत असुन,या वाहनांना फिटनेस प्रमाणपञ आहे का नाही?चालकाला कुठलेही व्यसन आहे का नाही? वैध वाहन परवाना पाच वर्षाचा आहे का नाही? मुलिंसाठी महिला प्रतिनिधी आहे का नाही? आपत्कालीन डोअर आहे का नाही? स्पीड गव्हर्नर आहे का नाही? या व अन्य बाबींची तपासणी करुन कार्यवाही होणे गरजेचे असतानाही कार्यवाही होत नसल्याने पिवळ्या रंगाच्या ही कांही ट्रॅव्हल्स नियम डावलुन विद्यार्थी घेऊन जातात..


0 टिप्पण्या