Ticker

6/recent/ticker-posts

१७ जाने. ते २ फेब्रु.२०२५ श्री भृशुंड गणेश भंडारा येथे पून्योत्सव पर्व निमित्त विशेष



भाणारा क्षेत्राधिश प्राचीन व जागृत श्री भृशूंड गणेश

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-वैनगंगेच्या पावन तीरावर भंडारा शहराला एक प्राचीन परंपरा व इतिहास आहे. पुराणकालीन गणेश उपासक महर्षी भृशुंड मुनीची भंडारा ही तपोभूमी असून भृशुंड गणेश आज वैदर्भीय अष्टविनायकातील एक महत्त्वाचे स्थान आहे.
प्राचीन भानारा क्षेत्राधिश श्री भृशुंड गणेश (मेंढा) ही प्राचीन व जागृत मूर्ती  प्रतिष्ठापित आहे.जसे _जसे दिवस जात होते तशातच ह्या मूर्तीला ११३० मध्ये जोशी वंशाचे मूळ पुरुष निळंभट भंडारेकरांनी प्रकाशात आणलेआणि मूर्तीची स्थापना केली आणि.११४४ मध्ये महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी येथे आले होते असा उल्लेख लीळाचरित्रात आहे.
   श्री भृशुंड गणेशाची मूर्ती अखंड रक्ताक्षम शिळेवर कोरलेली असून ही मूर्ती  गाभाऱ्यात तळापासून ८ फूट उंच व ४ फूट रुंद आहे. शेंदूर वर्णीत मूर्ती चतुर्भुज असून मुषकारुढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली आहे .शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मूख मंडळाच्या जागी दाढी व मिशा स्पष्ट दिसतात. मुखापासून सोंड निघालेली असून हातातील मोदकाकडे वळलेली आहे. महा वस्त्राचा पदर व मेखला स्पष्ट दिसत असून मुषकाचे पाय ,मूख व कान देखील स्पष्ट दिसून येतात. गणेश मूर्ती गुडघ्यापर्यंत आपल्याला दिसते बाकीचा भाग भूपृष्ठाखाली दबलेला आहे.बाजूला गिरी गोसावी वंशातिल अनेक महंत,साधु राहायचे .येथिल समाधि स्थानी दगडावरील सुंदर नक्षीकाम आपल्याला बघावयास मिळते.अजूनही आकर्षक ७ छत्र्या आणि ४ मंदिराचा समूह , नक्षीकाम भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.गणेश मूर्ती समोर शिवलिंग व नंदीची स्थापना गिरी गोसावी वंशातील महंत अलोनी बाबा छत्तरनाथ महाराज यांनी केलेली आहे. शिवलिंग व नंदीला पाय लागत असल्याने डावीकडील भागात त्यांना स्थानापन्न करण्यात  आलेआहे.पूजेला आत जातांना समाधी समूहाला लागूनच महावीर हनुमानाची उभी उग्र मूर्ती आहे ,ती डोक्यावर छत सहन करीत नाही असे या मूर्तीच्या बाबत सांगण्यात येते. या भागातील भाविक लोक मूर्तीचे परंपरेने उपासक असून हनुमानजी भक्तांना पावतात असा लौकिक आहे.
भृशुंड गणेशा बाबत पौराणिक आख्यायिका अशी आहे की ,येथे मुदगल ऋषी तपस्या करीत होते ,यावेळी नाम्या नावाचा एक लुटारू कोळी ऋषींना शरण आला व उद्धार करण्याची विनंती केली. ऋषींनी त्याला गणेशाची आराधना करण्याच्या निर्देश दिला. त्यानुसार तो गणेशाची आराधना करू लागला ,तपस्या करताना मुद्गल ऋषींनी तेथे एक वटवृक्षाची फांदी रोवली व म्हणाले की_ "मी पुन्हा येईन". वटवृक्ष कालांतराने भव्य झाला. तपस्या करणाऱ्या कोळीच्या अंगावर वारूळाचे थर जमले. जेव्हा मुद्गल ऋषी परत आले त्यावेळी वारुळाच्या आत तपस्यामग्न कोळी असल्याचे निदर्शनास आले. जवळून वाहत असलेल्या वैनगंगेच्या पात्रातून पाणी आणून तपस्या मग्न कोळ्याला बाहेर काढून पाहिले असता त्याला सोंड आलेली दिसली. अशी समाधि अवस्था पाहुन मुद्गल ऋषींच्या तोंडून "भुमध्यात शूंड: इती भृशुंड" असे उदगार निघाले आणि भृशुंड गणेश असे नामाभिधान झाले. मेंढा परिसरात अनेक मुर्त्या भगनावस्थेत आढळतात परंतु ८०० वर्ष लोटून गेल्यावरही भृशुंड गणेशाची मूर्ती तशीच राहिली आहे. भृशुंड रुपातील गणेश मूर्ती ही एकमेव असून इतरत्र कुठेही उपलब्ध नसल्याचे पुरावे तज्ञांनी दिलेले आहे. विदर्भातील अष्टगणेशामध्ये भंडाऱ्याच्या गणेशाचे स्थान आहे.
श्री चे इच्छेप्रमाणे पुढे विविधांगी अभ्यासातून प्रसिद्धी मिळून भक्तांनी पूजा_अर्चा सुरू केली, देवस्थान जागृत असल्याने फार दूरवरच्या भक्तांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. श्री विश्वासराव जोशी यांना श्री भृशुंड गणेश बाबत माहिती मिळाली असता त्यांनी इथे नियमितपणे पूजा इत्यादी सुरू केली. मूर्तीचे कायम स्थानाबद्दल बांधकामाकडे लक्ष देण्यास चालना मिळाली. समता नगर कॉलनी( फेज _१)येथे श्री प्रभात प्रेमशंकर जी गुप्ता यांचे बांधकामाचे कार्य सुरू असताना १९९४ साली  श्री विश्वासराव जोशी यांनी श्री गुप्ता यांना सोबत घेवून प्रथमतः मंदिराचे बांधकाम करण्यात आले.श्री विश्वासराव जोशी यांनी मंदिर परिसराला ऊर्जितावस्थेस आणले. १९८७ माघ शुक्ल ४ पासून सार्वजनिक उत्सवास सुरुवात झाली.१९९६ मध्ये देवस्थान ट्रस्ट स्थापन करण्यात आले. ७ विश्वस्त होते _ विश्वास गणपतराव जोशी(अध्यक्ष)प्रभात प्रेमशंकरजी गुप्ता(उपाध्यक्ष),अनंत गोविन्दराव गुप्ते(सचिव), रसिकलाल मकनजी ठकरार(कोषाध्यक्ष),डॉ.सुधाकरराव जोशी(सदस्य),प्रभाकर मनोहरराव पदवाड(सदस्य), डॉ.अरुण कुंभारे(सदस्य) /
 श्री विश्वासराव जोशी (अध्यक्ष) यांना ३१/०७/२०१० ला देवाज्ञा झाली आणि नंतर श्री प्रभाकर मनोहरराव पदवाड (सदस्य)हे १४/०३/२०१५ साली मरण पावल्याने ७ पैकी ५ पदाधिकारी कार्यरत आहेत. २ सदस्यांनी रीजाईन केले.कार्यकारिणी विश्वस्त मंडळा मध्ये सर्वश्री प्रभात  प्रेमशंकरजी गुप्ता(कार्यकारी अध्यक्ष),अनंत गोविंदराव गुप्ते(सचिव), रसिकलाल मकनजी ठकरार (कोषाध्यक्ष), डॉ.सुधाकरराव जोशी(सदस्य), डॉ.अरुण कुंभारे(सदस्य) ई. चा समावेश आहे.कमिटी ने बांधकाम समिती बनविली होती,यामध्ये श्री प्रभात प्रेमशंकर जी गुप्ता बांधकाम कमिटी चे अध्यक्ष होते,त्यांचे सोबत भोजराज वाघमारे,मुकेश थानथराटे,होते ,यांनी पुढाकार घेत स्वतः मंदिराचे१९९५_९६ साली  जीर्णोद्धार केले .भाविकलोकांचे मदतीने,विश्वस्तांना सोबतीला घेवून चंदा गोळा करून कामास प्रारंभ झाले. सन २००० मध्ये मंदिर निर्माण दरम्यान एक दुर्दैवी दुर्घटना घडली.गणपतीच्या पायालगत शिवलिंग होते. भगवान शिव आणि त्यांचे पुत्र भगवान गणेश आणि त्यांचे जवळच शिवलिंग असे.मंदिरात भक्तांना पूजा करिता आत जाताक्षणी त्यास पाय लागत असे.मंदिराचे कंत्राटदार गजानन सोमाजी कडव यांनी ते शिवलिंग आदेशाप्रमाणे मजुराद्वारे सब्बलिने तोडून इतरत्र त्याची स्थापना केली होती.  काही दिवसा नंतर १ मे २००० रोजी कार्ध्याच्या टोलनाका चौरस्त्यावर ते आपल्या कुटुंबासह गाडीने जात असताना गाडी ट्रक खाली आल्याने दुर्घटनेत गजानन कडव हे सपत्नीक अत्यंत दुःखदरित्या मृत्यू पावले.या मागे ही देवाची इच्छा होती की कुणी दैविय शक्ती.हे माहीत नाही.
आतापावेतो येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये अनेक संत,महात्मे येऊन गेले.श्रीमद् आद्य शंकराचार्य,शृंगेरी पीठ श्री श्री भारती तीर्थ,स्वामी महाराज(१५/०१/१९९५), कंवाष्रम आश्रम गुलबर्गा, शंकराचार्य (सन २०००),आचार्य श्री किशोरजी व्यास, डॉ विनोदकुमार त्रिपाठी(वाराणशी),श्री गोविंद हरी( बिकानेर),संतश्री अच्युत महाराज(अमरावती), नाना महाराज तारणेकर(इंदूर) तथा राजकीय क्षेत्रातून केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी(सपत्नीक) ई .
       ग्रामदेवता श्री भृशुंड गणेश (मेंढा) भंडारा येथे दि:१७ जाने.ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुण्योत्सव पर्वाला सुरुवात होणार असून या दरम्यान अभिषेक, भजन,कीर्तन,हरिपाठ,सुंदरकांड,सामूहिक स्त्रोत्र पठण,महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.या करिता मंदिर ट्रस्ट कमिटी प्रयत्नशील आहे.
                 _*मो.सईद शेख,भंडारा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या