Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा व हाळी हद्दीतील काळ्या धंद्यावर आली संक्रांत


नुतन पोउपनी.टोपाजी कोरके यांनी सलग दुस-यादिवशी पकडला गुटखा
178085 रु.च्या मुद्देमालासह तीन आरोपी ताब्यात...

चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-उदगीर तालुक्यातील वाढवणा <बु>  पोलीस ठाण्यात नुकतेच जाॅईन झालेल्या पोउपनी.टोपाजी कोरके यांनी गत ४/५ दिवसांपासुन अवैध धंद्याविरुध्द कायद्याची "सुंदरी" चालवायला सुरुवात केलीय, म्हणजे धाडसञ सुरु केल्याचे दिसत आहे. यात गत सप्ताहात सलग 2 दिवस हाळीत मटक्यावर धाड टाकली. तर दि.11 रोजी हाळीतील 2 गुटखा तस्करांसह 49 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.यातील 2 ही आरोपी  अद्यापही "ससुराल" म्हणजे अटकेत आहेत.असे असतानाच दि.12 रोजी मिळालेल्या माहितीवरुन पोउपनी. टी.कोरके व टीमने डोंगरशेळकीतील बालाजी गोविंद मरेवाड यांचे शेता जवळ दु.2.30 वा.राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा,सुंगधीत तंबाखु, जर्दा व 2 वाहनांसह 178085/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात पोलीस नाईक एम.एम. केंद्रे 1434 यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी क्र.(१) अभय गुंडेराव बिरादार वय 28 रा.किनी यल्लादेवी (२) नारायण शिवाजी कौडगावे वय 30 रा.सुकणी (३) भागवत नारायण बिडवई वय 63 रा.वाढवणा बु.या 3 आरोपींविरुध्द १४/२०२५ कलम— १२३,२२३,२७४,२७५,३ {५} भा. न्या.सं.व कलम-५९ अन्न सुरक्षा औषधी मानदे अधिनियमन-२००६  नुसार गुन्हा दाखल झाला असुन, यात 38085 रु.चा गुटखा व सुगंधीत तंबाखु,जर्दा तसेच रुपये 140000 किंमतीच्या 2 बाईक्स सह वरील नमुद 3 ही आरोपी वाढवणा  पोलीसांच्या ताब्यात आहेत.वाढवणा पोलीस विशेषत: नुतन पोउपनी.टी. कोरके यांनी वरीष्ठांच्या सल्ल्यानुसार पोहेकाॅ.संजय दळवे,हेकाॅ.शिवप्रताप रंगवाळ,संजय कलकत्ते,सोनकांबळे, अक्केमोड,कसबे यांच्या टीमसह या भागातील अवैध धंद्यावर धाडसञ सुरु केल्याचे चिञ दिसुन येत आहे. या धाडसञामुळे अवैध धंदेवाल्यांवर कारवाईची "संक्रांत" आली आहे..
वरीष्ठ पोलीस अधिका-यांचे आदेश असल्याने जिल्ह्याभरात विविध पो.स्टे.च्या हद्दीत अवैध धंद्यावर धाडसञ सुरुच आहे.तरीही कांही महाभाग काळे धंदे करत असल्याचे दि.११ रोजी हाळीत व दि.१२ रोजी डोंगरशेळकी शेत शिवारात पकडलेल्या गुटख्यावरुन सिध्द झाले आहे.तसेच जिल्ह्यामध्ये धाडसञ सुरु असतानाही कर्नाटक या पर राज्यातुन उदगीर व्हाया अहमदपुर, शिरुर ताजबंद,वाढवणा, लाळी बु. या गावापरिसरात गुटखा व सुगंधीत जर्दा,तंबाखुची *ईनकमींग* होतेच कशी?कर्नाटक सिमेवर असलेले महाराष्ट्र (लातुर) पोलीसं करतात तरी काय?याचा शोध नांदेडचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलीस अधिक्षक सोमय मुंडे हे घेतील का?याकडे जाणकार नागरीकांचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या