Ticker

6/recent/ticker-posts

मोहाडी ग्रांम पंचायत येथे स्वामित्व योजनेतुन सनद प्रमाणपत्र (प्रापर्टी कार्डाचे) वितरण व पंतप्रधान महोदयांचे लाईव्ह संभाषण दाखविण्यात आले••••••••••••


 चित्रा न्युज ब्युरो     
गोंदिया :- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास, महसूल विभाग व भुमि अभिलेख विभागामार्फत ड्रोण सर्वे द्वारे करण्यात आलेल्या स्वामित्व योजनेतुन प्रापर्टी कार्डाचे वितरण आज दिनांक १८ जानेवारी ला ग्रांम पंचायत मोहाडी येथे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रापर्टी कर्डाचे महत्त्व सांगताना या स्वामित्व योजनेतुन मिळणाऱ्या प्रापर्टी कार्डाला खुप मोठे महत्त्व आहे आता मालमतेवर सुलभतेने कर्ज काढण्यास सोपे होईल,मालकीचा पुरावा असल्याने मालमत्तेचे विवाद कमी होणार, ग्रामपंचायतला सुध्दा कर आकारणी करणे शक्य होऊण गावविकास साध्य होणार अन्य काही स्व उत्पणाचे श्रोत निर्माण होणार आहे ग्रामीण भागातील घराना पक्के मालकी हक्क मिळणार असल्याचे सांगितले 
यावेळी देशांचे पंतप्रधान मा नरेंद्र जी मोदी यांचे लाईव्ह संभाषण दाखविण्यात आले यावेळी उपसरपंच मोहनलाल पटले,तंन्टामुक्त गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सदस्य भिवराज शेंन्डे,पुस्तकला पटले, प्रभा पंधरे,पुजा डोहळे,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, जे जे पटले सर, सीताराम भोयर,तेजलाल कावडे आदी गावातील व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रांम पंचायत अधिकारी पी बी टेंभरे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या