श्रीकांत बारहाते - जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली :-संपूर्ण महाराष्ट्राभर फॉल्टी मिटर च्या जागी स्मार्ट मिटर प्रिपेड मिटर बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे मिटर रिडिंग घेणारे व विज बिल वाटणाऱ्या कामगारांवर येणाऱ्या काळात उपासमारीची वेळ येईल आम्ही शासनास व महावितरण ला उपोषण च्या माध्यमातून निवेदन दिले व आमची मागणी स्मार्ट मिटर लागल्यावर शासनाने आम्हाला वयाच्या साठ वर्षे होई पर्यंत शासनाने रोजगाराची शास्वती द्यावी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात ऊर्जा मंत्री यांना निवेदन दिले होते परंतु त्यांनी सांगितले एक महिना नंतर संघटनेसी चर्चा करु परंतु अद्याप चर्चेला बोलावले गेले नाही त्यामुळे
नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही महावितरण व शासन जोपर्यंत मिटर रिडिंग व बिल वाटप करणारे कामगार यांच्याशी चर्चा होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन राहिल दिनांक- 1/2/2025 पासून काम बंद आंदोलन राहिल त्यामुळे शासनाने व महावितरण यांचे कुठल्या प्रकारचे नुकसान झाले तर एम एस ई डि सी एल मिटर रीडर कामगार संघटनेला वेठिस धरु नये.
0 टिप्पण्या