Ticker

6/recent/ticker-posts

ऊसाच्या ट्रॅक्टरवरचे भोंगे हटवा.हाळी-हंडरगुळीकर जनतेची मागणी

ऊसाची ओव्हरलोड वाहतूक जोमात
प्रशासन कोमात ..

चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-राज्यभरातल्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात चालू आहे.तसा या भागातील बहूतांश शेतकरीबांधव आपला ऊस साखर कारखान्यांना देत असून,ऊस वाहतूक करणारे वाहने नियमबाह्य लोड भरुन तसेच वाहनांवर मोठमोठ्या आवाजामध्ये "भोंगे" {साऊॅंड सिस्टीम} लावुन ऊस वाहतूक करताना सामान्य जनतेला दिसत आहेत.आणि हे सर्व प्रकार नियमबाह्य असलातरीही आजवर या अशा वाहनांवर तत्कालीन "सिंघम" आयपीएस पोलीस अधिकारी कदम निकेतन यांनीच कारवाई करायची धमक दाखविली होती.तद्नंतर अशा धोकादायक वाहतूकीवर आजवर ना RTO आरटीओ ने कारवाई करायची धमक दाखविली,ना इतर अधिकारी महोदयांनी.यामुळे ऊसाची बेकायदा व धोकादायक वाहतूक जोमात चालू असल्याचे बघून तर संबंधित यंञणा कोमात गेली की काय ? असा प्रश्न हाळी-हंडरगुळीकरांसह अन्य वाहन चालक-मालक मंडळीमधून चर्चीला जात आहे.तेंव्हा ऊसाची वाहतूक करणा-या वाहनांवरील भोंगे परवाना घेऊन वाजत आहेत.का? नसतील तर भोंगे हटविण्याचे धाडस करणार कोण व कधी?याकडे सर्वसामान्य जनतेसह अन्य वाहनधारकांचे लक्ष लागले आहे .

ऊस वाहतूकीसाठी दोन-2ट्राॅली

सगळीकडे साखर कारखान्यांचा हंगाम चालू आहे.म्हणुन हंडरगुळी व परिसरातील बहूतांश सभासदांचा ऊस गाळपासाठी जातोय.माञ ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स दोन ट्राॅली मध्ये क्षमतेपेक्षा व वाहतूक परवान्या पेक्षाही जास्त लोड भरुन ऊसाची राञं-दिवस वाहतूक करताना दिसत आहेत.व संबंधित अधिका-यानी यासाठी नियम,कायदा वेगळा आणि अन्य लोडेड गाड्यांना नियम,कायदा वेगळा बनविला असावा.म्हणुनच तर उडत्या चालींच्या गाण्याच्या चालीवर दोन-2 ट्राॅलींमधून ऊसाची जीवघेणी वाहतूक होत असल्याचे सगळ्यांना दिसते.माञ संबंधितांना दिसत नाही.  यामागचा "अर्थ" व "कारण" काय ?


रिफ्लेक्टरविना होतेय वाहतूक!

ऊसाची वाहतूक करणारे बहूतांश ट्रॅक व ट्रॅक्टर्स यांना रिफ्लेक्टर्स वा रिडियम लावल्याचे दिसत नाही. विशेषत: नाईटला असे वाहन दिसेना व मागुन येणा-या वाहनचालकाची  धांदल उडते.व एखाद्यावेळी अपघात पण होतात.तरी याकडे ही संबंधित अधिका-यानी लक्ष देणे गरजेचे आहे


कानात हेड फोन तरीही साऊॅंडचा गोंगाट

अनेक ठिकाणी ऊसाची वाहतूक करणारी वाहने पलटी खाल्याची बातमी सतत वाचण्यात येते.आणि अशा वाहनांचा अपघात होण्याला अनेक कारणे असतात.त्यापैकी एक कारण म्हणजे वाहनावर मोठमोठ्या आवाजात वाजणारे भोंगे / साऊॅंड्स तसेच हे कमी म्हणुन की,काय कांही उत्साही ड्रायव्हरं कानात हेड फोन (ईअर बट} लावुन गाण्याच्या धुंदीत बेंधूद होऊन वाहन चालविताना या भागात सर्रासपणे दिसुन येतात.माञ आरटीओ व कारखाना प्रशासनाचे {अ} कर्तबगार अधिका-यांना दिसत कसे नाही?का,त्यांच्याच पाठींब्याने अशी धोकादायक व ओव्हरलोडेड वाहतूक होतेय का? याचा संबंधित वरीष्ठ अधिका-यानी शोध घ्यावा व कारवाईचे "ब्रम्हअस्ञ" चालवावे ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या