Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.शाळेला अवैध चिकन सेंटर्सचा गराडा;मेन गेटला कुलुप


चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-मुख्यमंञी माझी शाळा,सुंदर शाळा ही मोहिम राबवुन सुंदर शाळेला राज्यशासन बक्षीस देत आहे.परंतू हंडरगुळी येथील जि.प.केंद्रीय प्रा. शाळेला विनापरवाना चिकन,मटन विक्री सेंटर्सधारकांनी"गराडा"घातला आहे.यामुळे या शाळेचे जुने व मेन गेट हे सताड कुलूपबंद असते.तसेच घाणवासामुळे विद्यार्थी संख्या खुप कमी झाली आहे.तसेच या शाळेला अवैध माॅंस विक्रेत्यांनी मोठा "गराडा' घातला असल्याचे सामान्य जनतेला दिसते.माञ संबंधित अधिका-यांना दिसत नाही.याचे कारण "आर्थीक" तर नाही,ना? आणि या माॅस विक्री सेंटर्समुळे ही शाळा सुंदर येणार का. व कशी? या सर्व बाबतची पाहणी जायमोक्यावर जाऊन करुन योग्य कार्यवाही करण्याचे i.p.S. निकेतन कदम यांच्या सारखे "धाडस" संबंधित खात्याचे तालुका व जिल्हा स्तरीय अधिकारी दाखविणार कधी?याकडे हाळी व हंडरगुळीसह परिसराचे लक्ष आहे ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या