Ticker

6/recent/ticker-posts

राज्यमार्गावर हाळी-हंडरगुळीरांच्या अतिक्रमणधारकांचा "तंबू" याला कोणता अधिकारी लावणार "बांबू".?चिकन सेंटर्समधील वेस्ट मालांचा मेनरोडवर'ढिगारा''व शाळेला 'गराडा'


चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-उदगीर-अहमदपुर तालुक्याचे सेंन्टर पाॅईंट असलेल्या व उदगीर नंतर या तालुक्यात सर्वात मोठे गाव व मार्केट असलेल्या तसेच नांदेड-बिदर या राज्यमार्गालगत वसलेल्या हाळी व हंडरगुळी या 2 गावातील रोडवर शेकडो लोकांनी केलेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांमुळे या मार्गाचे सौंदर्य नष्ट झालेय व सर्व सामान्य जनतेचा व या रोडचा जीव गुदमरतोय. तरीही याकडे कुणीही लक्ष देत नाही.म्हणुन येथे अतिक्रमणधारकांनी आपला "तंबू" म्हणजे हातगाडे,टेबलं,बाकडे,खुर्च्या आदी रोडवरच ठेवल्याचे/ठोकल्याचे दिसते.व चिकन सेंटर्स मधील चिकन,हाडं,पंखं,रक्त यासारखा वेस्ट माल याच रोडवर टाकत असल्याने याचा सगळीकडे व दुरवर "ढिगारा" जमल्याचे दिसत आहे.तरी यावर कारवाई का करीत नाहीत? का,संबंधित अधिका-यांना "पॅकेट" व "लेग पीस" दर महिना "गीफ्ट" म्हणुन येथील सगळेच अतिक्रमणधारक देतात की काय?
गत कित्येक वर्षापासुन येथे कांहींनी अतिक्रमणाच्या ठोकलेल्या "तंबू" ला हटवायचा "बांबू" तत्कालीन i.p.s. आयपीएस (सिंघम) पोलिसाधिक्षक मा.निकेतन कदम यांनी कांही वर्षा पुर्वी लावुन हे अतिक्रमण काढायला लावण्याचे "धाडस" केले होते.परंतू त्यांची बढती झाल्याने अन्यञ ड्यूटी साठी गेल्याने निकेतन कदम यांच्या सारखे "धाडस" आजवर कोणत्याच अधिका-यांनी दाखविले नाही.तसेच दाखवायची "गॅरंटी" ही नाही. म्हणुन अतिक्रमणधारकांनी येथे पुन्हा "तंबू" ठोकले आहेत.तेंव्हा निकेतन कदम यांच्यासारखे धाडस दाखवुन येथील अतिक्रमणधारकांचे "तंबू" कायमचे काढणार कोण ? व कधी ? असे प्रश्न हाळी-हंडरगुळीकरांमधून संबंधित अधिका-यांना विचारले जात आहेत.
उदगीर शहरानंतर तालुक्यात मोठी बाजारपेठ व लोकसंख्या असलेल्या हाळी-हंडरगुळी या गावातील आणी परिसरातील वाढती लोकांची तसेच वाहनांची संख्या पाहता हा राज्यमार्ग अतिक्रमणमुक्त होणे गरजेचे बनले आहे.आणि याकडे सं - प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे असतानाही याकडे संबंधित अधिकारी "अर्थपुर्ण"
कानाडोळा करीत असावेत.अशी शंका जनतेतून वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या