Ticker

6/recent/ticker-posts

स्मारकाचे काम गुणवत्तापूर्ण व गतीने करा डॉ.विवेक जनार्दन मवाडे


स्मारकाचे काम दर्जाहीन शहिदांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचेच असावे

10 कोटींची आर्थिक तरतूद करा
 रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे निवेदन

छ. संभाजीनगर:- तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करत नामांतरासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊनही नामांतर शहिदांच्या स्मारकाला गुणवत्ता व दिरंगाई चे ग्रहण लागले असल्याने नामांतर शहिदांच्या स्मारकासाठी पुन्हा पुन्हा संघर्ष करावा का ? असा सवाल उपस्थित करत शहीद जनार्दन मवाडे यांचे पुत्र डॉ.विवेक मवाडे यांनी स्मारकाचे काम गुणवत्ताशून्य होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

दोन वर्षांपूर्वी  १४ जानेवारी २०२२ रोजी स्मारकाचे भूमिपूजन पार पडले कंत्राटदार नेमण्यात येऊन एका वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले परंतु ३ वर्षातही स्मारकाचे काम पूर्ण झाले नाही, सुरू असलेले बांधकामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे विद्यापीठ प्रशासनाने काम गुणवत्तापूर्ण होत नसतांना त्याकडे का दुर्लक्ष केले, वेळेत काम पूर्ण होत नसतानाच आता जमिनीच्या मालकीचा वाद न्यायालयात पोहोचल्याने स्मारकाच्या बाबत प्रशासनाची भूमिका अप्रामाणिक व संशयास्पद आहे असा आरोप डॉ.मवाडे यांनी केला आहे.
आज डॉ.विवेक जनार्धन मवाडे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, सुरेखा मवाडे, दासू भगत, सुनील निकाळजे,ऍड.अतुल कांबळे, विकास रोडे, राष्ट्रपाल गवई, सम्यक सरपे, पँथर्स रिपब्लिकन चे गुणरत्न सोनवणे, अमित घनघाव यांनी प्र कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे यांची भेट घेऊन स्मारकाला होणाऱ्या दिरंगाई बाबत नाराजी व्यक्त केली.  यावेळी विधी अधिकारी श्री. नाडे, स्थावर विभागाचे अभियंता श्री काळे,श्री.गंगावणे आदींनी स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिली.
यावेळी रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे स्मारकासाठी किमान १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, नामांतराच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचेच असावे, नामांतर लढ्याचा लौकिक जगभरात पसरलेला असल्याने ह्या अस्मितेच्या लढ्यात प्राणार्पण करणाऱ्या शहिदांच्या स्मृति चिरकाल अभ्यासल्या जाव्यात व येणाऱ्या सर्व पिढ्यांना ह्यातून ऊर्जा मिळावी अश्या स्वरूपाचे हे स्मारक असावे हे नमूद करून
 प्रत्यक्ष वृत्तांकन करणारे जेष्ठ पत्रकार,नामांतर लढ्यातील प्रत्यक्ष सहभागी व विद्यार्थी संघटना, लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते ह्यांच्या मार्फत स्मारकासाठी माहिती संकलित करण्यात यावी, सर्व शहिदांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहण्यात यावे, शहिदांचे फोटो, जन्म, शहीद झाल्याची दिनांक, ठिकाण, शिक्षण, त्यांची कौटुंबिक माहिती हाच तपशील , नामांतर लढ्यातील ठळक घडामोडी,  वृत्तपत्रात प्रसिद्ध वृत्तांचा संग्रह, नामांतर लढ्यावरील शोध प्रबंध, ग्रंथ, महत्वाचे लेख, विचारवंतांनी केलेले विवेचन ह्याचा तपशील संग्रहालयात असावा, नामांतर लढ्याच्या स्मृती जगविणारे घटनानिहाय क्रिएटिव्ह स्कल्पचर, म्युरल्स पॅनल उभारण्यात यावे, तत्कालीन विद्यापीठाचे परिक्षेत्र, संलग्नित महाविद्यालय, अभ्यासक्रम ह्यांचा तपशील तिथे उपलब्ध असावा, नामांतर लढ्यात विस्थापित झालेल्या गावांच्या पुनर्वसन चा तपशील असलेले फलक उभरावेत, नामांतर लढयात सहभागी नेत्यांनी भोगलेले कारावास ह्याची माहितीचे फलक उभरावेत, नामांतर करण्यात यावे ह्या करिता ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या ऐतिहासिक ठरावाच्या प्रति चे संकलन
कविता,लेख,गीते ह्यांची माहिती स्मारकात असावी, नामांतर शहीद स्तंभ हा भव्य असावा परंतु त्याचे क्ले मॉडेल ला कला संचालनालय यांची मान्यता घ्यावी निकष पूर्ण करूनच तो उभारावा, संविधान प्रस्ताविकेची भव्य प्रतिकृती स्मारकात उभारावी, विद्यापीठ स्थापनेचा इतिहास दर्शविणारी माहिती फलक उभारावे, आंबेडकर पार्क, उत्तरप्रदेशच्या धर्तीवर भव्य विविध प्रतीके असलेले सुसज्ज उद्यान बनवावे अश्या मागण्या कुलगुरूंकडे केल्या आहेत.
स्मारकाला वाढीव निधी मिळावा यासाठी लवकरच शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांची भेट घेणार आहे, स्मारकाला निधी मिळावा यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवावा अशी सूचना डॉ.मवाडे यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या