Ticker

6/recent/ticker-posts

जय भीम बुद्ध विहार मांडेगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी
बार्शी : बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन उज्वला सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका धुमाळ मॅडम, रतन शिंदे आणि लता मिरगणे यांना भारतीय संविधान देऊन सन्मानित केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना विहाराच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत आणि पेन यांचे वाटप करण्यात आले. 

या वेळी किरण मिरगणे, सातनाक सर, पारडे सर, गणेश, गणेश चव्हाण, रमेश सोनवणे, संजय सोनवणे, उमेश्वर सोनवणे, कालिदास ढावारे, माणिक सोनवणे, सुखदेव सोनवणे, मंगल सोनवणे, रेखा सोनवणे, शोभा सोनवणे, प्रणव जावळे, शीला जावळे, साहेबराव ढावारे, भारतीय बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष रामभाऊ सोनवणे, समता सैनिक दलाचे राजेंद्र जावळे, आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
-----


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या