पाच महिला, दोन पुरुष जखमी
चित्रा न्युज प्रतिनिधी
धाराशिव :-वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाका कारखान्यात भीषण आग लागली, यात पाच महिला आणि दोन पुरुष जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, फटाका उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने काही क्षणातच विक्राळ स्वरूप धारण केले. या स्फोटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे, मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल तत्काळ दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून कारखान्यातील सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास करण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तपासानंतर अधिकृत अहवाल जाहीर केला जाईल.
0 टिप्पण्या