Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लिलावती रुग्णालयात अभिनेते सैफ अली खान यांची घेतली भेट

 
चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : - हिंदी सिनेमातील प्रसिध्द अभिनेते सैफ अली खान यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.अभिनेते सैफ अली खान यांच्या घरात घुसुन जबरी हल्यात सैफअली खान जखमी झाल्याचे कळताच ना.रामदास आठवले यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात सैफअली खान यांची भेट घेतली.या हल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ना.रामदास आठवले यांनी तिव्र निषेध केला आहे

.हल्यानंतर सैफअली खान यांना  हिंमत देऊन त्यांना सावरण्यासाठी त्यांच्या पाठीशी सरकारची भक्कम साथ असल्याची ग्वाही देण्यासाठी आपण सैफअली खान यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आणी त्यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मी त्यांना भेटून आलो. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांनी मला दिली. सैफ अली खानवर झालेला हल्ला निषेधार्थ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी होता, तो पैसे दिले पाहिजे असं काहीतरी बोलत होता. मात्र, त्यानंतर सैफ अली खानवर त्या व्यक्तीने वार केले. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. कारण अशा प्रकारे कायदा आणि सुव्यव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गंभीर आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडता कामा नये, यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करतील. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो व्यक्ती त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा चोरीचा प्रयत्न फसल्यामुळे त्याने हल्ला केला असावा”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

“अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेच्या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांना सक्त सूचना देण्याची आवश्यकता आहे”, असं रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या