चित्रा न्युज ब्युरो
गोंदिया :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अनुषंगाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम तालुका तील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रम घेतले जात आहेत वाचन कौशल्य कार्यशाळा व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, उपाध्यक्ष जे जे पटले, मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार, प्राचार्य राजेंद्र रहमतकर,जि प शाळा चे मुख्याध्यापक सी के बिसेन, हिरालाल महाजन, प्रमानंद तिरेले, चंन्द्रकुमार चौरागडे, सेवानिवृत्त प्राचार्य डि आर चौरागडे,वाय एफ पटले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी निरंतर व सतत वाचनाची सवय लागावी कोणती पुस्तके वाचावीत ,कशी वाचावीत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी , ग्रंथालयातील ग्रंथाची माहिती व्हावी यासाठी यासाठी वाचन कौशल्य कार्यशाळा व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
"वाचाल तर वाचाल " ग्रंथ हे एक मानव जातीसाठी लाभलेली एक अनमोल देणगी आहे पुस्तकांचे महत्त्व केवळ शब्दामध्ये व्यक्त करणे कठीण आहे कथा, कांदबरी, कविता व महान समाजसुधारक चे चरित्रे वाचन केल्याने आपली कल्पना शक्ती विकसित होते आपला ताणतणाव कमी होते व नवीन दूरदृष्टी निर्माण होते अशा कार्यक्रमाचे माध्यमातून जनजागृती होऊन वाचाल तर वाचाल - शिकाल तर टिकाल हा संदेश जातो
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सचिव सुभाष चौरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा चेचाने यांनी केले यावेळी ग्रंथालयाचे स्पर्धात्मक परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी,जि प शाळा चे विद्यार्थी व वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 टिप्पण्या