लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-दिं.१७ फेब्रुवारी पासून लोकस्वराज्य आंदोलन व महाराष्ट्रासह भारतातील मातंग समाजाची एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या वेगवेगळ्या याचीका मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित होत्या. त्या निकाली काढत दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात एस सी उपवर्गीकरण मान्य करून, उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाला तो घटनात्मकअधिकार आहे.असा न्याय निवाडा अंतिम निकालात दिला आहे. या नंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. निवडणुकआधी महायुती सरकारने हे उपवर्गीकरण करण्यासाठी अभ्यास समिती गठीत केली आहे. आणि आपल्या लेखी आदेशात येत्या तीन महिन्यात अंतिम अहवाल द्यावा.असा आदेश दिला होता. परंतु या समितीने मुदतीत अहवाल दिलेला नाही. अहवाल दिला नसल्याने या समितीला परत मुदतवाढ देण्यात आली आहे.परंतु सत्ताधारी महायुतीचे सरकार जाणीवपूर्वक चालढकलपणा करत मातंग समाजाची दिशाभूल करत आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका लागणार आहेत.त्यामुळे परत हा विषय आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार आहे. फक्त निवडणुकी पुरता हा विषय आज अजेंड्यावर घेऊन समाजाची शुद्ध फसवणूक होणार नाही.यासाठी आता आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारणार असा ईशारा संस्थापक/अध्यक्ष प्रा. रामचंद्रजी भरांडे सर नांदेड यांनी व्हीआयपी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित मराठवाडास्तरिय पदाधिकारी कार्यकर्ते आढावा व नियोजन बैठकी प्रसंगी दिलाआहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासूनची मातंग समाजाची एस सी आरक्षणाचे अबकड उपवर्गीकरण करावे.अशी प्रमुख मागणी आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याच केंद्र,राज्य सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार केलेला नाही.कारण राज्य सरकारची भूमिका अशी झाली आहे. की,मातंग समाजाला काही नाही, दिले तरी मातंग समाज आपले काही ही वाकडे करु शकणार नाही.गेल्या २५ वर्षापासून महाराष्ट्रात लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र महाधरणे, निदर्शने, महामोर्चा, पदयात्रा, लाँगमार्च, महाउपोषण, बेमुदत आमरण उपोषण करुन लोकशाही मार्गाने आजही हा लढा लढत आहेत.
दिनांक १५ डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन मा.ना.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नागपुर हिवाळी अधिवेशनावर प्रा.रामचंद्रजी भरांडे सर नांदेड यांच्या भव्य नेतृत्वाखाली नांदेड ते नागपूर असा पायी प्रवास करुन विधान भवनावर हजारोंचा आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चा नेला असता.या महामोर्चातील महिला, वृद्धावर,पुरुष,युवक,युवती,विद्यार्थी, विद्यार्थिनींवर प्रचंड लाठीचार्ज संपुर्ण महाराष्ट्रासह देशाने पाहिला आहे. म्हणून आज परत एकदा तशाच आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे.
हे आंदोलन चालवण्यासाठी ऊर्जा देण्याचे मातंग समाजातील पुरोगामी विचारांच्या समर्थकांची गरज आहे. समाजातील रिक्षाचालक, हमाल, भाजीविक्रेते,कामगार, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, अभियंते,अधिकारी, विद्यार्थी, युवक, महिलांनी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाधरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहनही प्रा. रामचंद्रजी भरांडे सर यांनी केले.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस नामदेवराव गायकवाड, प्रा. बी.आर. पारसकर मराठवाडा अध्यक्ष,अतुल खंडगावकर जिल्हाध्यक्ष, राम वाघमारे शहर सचिव, हनमंत नामाकार जिल्हा सचिव,सौ.सपनाताई दळवी महिला जिल्हाध्यक्ष, सौ.छायाताई बाबर शहराध्यक्ष, दत्ता पवार राजणगांव शहराध्यक्ष, जेजेराव मोरे, प्रकाश ननुरे,परमेश्वर मोरे, एकनाथ गायकवाड शहर सचिव, नागनाथ पवार, विनायक वाघुले, आदी सह समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या