चित्रा न्युज प्रतिनिधी
वाशिम – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रांताध्यक्ष पंडित कांबळे यांचा तथागत ग्रुपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार वाशिम येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वाशिमच्या पत्रकार भवनात अमरावती विभागीय संवाद बैठकीत संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस तसेच तथागत ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांनी पंडित कांबळे यांचा विशेष सत्कार केला. व रिसोड तालुका अध्यक्ष पदी संदिप राऊत यांची निवड करण्यात आली. वाशिम येथील पत्रकार भवन येथे सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रमेश चंदनशिव, वाशिम जिल्हा अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, सामाजिक न्याय विभाग) यांनी केले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे (वाशिम जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) उपस्थित होते. यावेळी बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती विभागीय बैठकीत उपस्थितांनी पक्षाच्या भविष्यातील कार्ययोजनांवर चर्चा केली तसेच आगामी काळात सामाजिक न्याय विभाग अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाने वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटनात्मक बळकटीकरणाला चालना मिळाल्याचे स्पष्ट झाले. कार्यप्रणाली, आगामी कार्यक्रम आणि संघटनात्मक बळकटीकरण यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. विभागातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, तालुकाध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या