चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-शहरातील मार्केट यार्ड परिसरातून रेहान रफिक ढलायित (वय १६) हा तरुण २५ जानेवारीपासून बेपत्ता असून, पालकांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रेहान हा मार्केट यार्डमधील फळ विक्रेत्याच्या दुकानात हमालीचे काम करत होता. त्याने २४ जानेवारी रोजी दुकानमालकाकडून २०० रुपये घेतले होते, त्यानंतर तो अचानक गायब झाला. पालकांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
रेहान अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही कोणीतरी अज्ञात इसमाने त्याला फूस लावून पळवून नेले असावे, असा पालकांचा संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फूटेज आणि मित्रांकडून चौकशी केली जात आहे. नागरिकांनी काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या