Ticker

6/recent/ticker-posts

संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रुग्णांना फळे पाणी वाटप

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाततील रुग्णांना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुडे यांच्या हस्ते फळे बिस्किट यांचे किट  व पाणी बाटली वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
 प्रथम श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केळी बीट बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप कार्यक्रम घेऊन एक चांगला उपक्रम घेतला असून त्यांचे अभिनंदन केले तसेच अकलूज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुडे यांनीही सदर कार्यक्रमाचे कौतुक करून उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचा सत्कार केला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे युवक तालुकाध्यक्ष कबीर मुलानी तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्कप्रमुख  राजू बागवान तालुका युवक संघटक विकी लोंढे तालुका युवक संपर्कप्रमुख योगेश डावरे   माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्वातीताई धाईंजे अकलूज शहराध्यक्षा पुष्पाताई भडंगे अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान तालुका कार्यकारणी सदस्य सागर झेंडे आकाश गायकवाड अजय साळुंखे चरण साळुंखे वैभव अंबुरे दत्ता थोरात राज  लोंढे अविनाश धाईंजे ऋषिकेश खडतरे  यांचेसह प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या