Ticker

6/recent/ticker-posts

शिव पानंद शेतरस्त्यांना निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार


समृद्ध महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

जिल्हा तालुका प्रशासनासोबत ग्रामप्रशासनाची जबाबदारी महत्वाची-शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील( शिव पानंद शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य)

चित्रा न्युज प्रतिनिधी
अहमदनगर :-शेतकरी समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेत तिथे रस्त्यांसाठी राज्यभर शासननिर्णयासह, हायकोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर जनजागृती जन आंदोलनाच्या माध्यमातुन प्रशासणाचे,सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लढा सुरू केला असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील शेतरस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल चळवळीच्या वतीने आभार मानन्यात आले पुन्हा नव्याने घेतलेल्या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिव पानंद शेतरस्त्यांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले तसेच राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. शिव पाणंद शेतरस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत शिव पाणंद रस्ते,शेतरस्ते, सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंदच्या अंमलबजावनीच्या मागणीची दखल महसुलमंत्री बावनकुळे यांनी घेत रस्त्यांच्या नंबरीं सर्वेक्षण करुन नंबरीं हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल शेतरस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असुन शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करू नये अशा चळवळीच्या विविध मागण्यांचा विचार राज्य सरकारकडून करण्यात आल्यामुळे जिल्हा तालुका प्रशासणासोबत ग्रामप्रशासनाची जबाबदारी वाढली असुन शेतकऱ्यांसोबत नागरिकांनी दर्जेदार शेतरस्ते करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
*चौकट- राज्यातील ब्रिटीशकालीन शिव पानंद शेतरस्ते खुले करणारा सरकारचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग खुला करणारा हेच शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे मोठे यश असुन राज्यभर सरकारसोबत चळवळीचे कौतुक होत असुन शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्याची जबाबदारी जिल्हा तालुका प्रशासनासोबत ग्रामप्रशासनाची- शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ)*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या