Ticker

6/recent/ticker-posts

भारताच्या एकता, अखंडतेसाठी करण्यात आलेली दुआ आणि प्रार्थना

(भंडाऱ्यात तबलीगी इज्तेमाचा भव्य आयोजन संपन्न)  

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-भंडाऱ्यातील रेल्वे ग्राउंड, राजीव गांधी चौक येथे आयोजित दोन दिवसीय दीनी इज्तेमा अत्यंत शांतिपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. देशातील एकता, अखंडता, सुख-शांती, अमन आणि बंधुत्व सदैव टिकून राहावे यासाठी विशेष दुआ आणि प्रार्थना करण्यात आली.  

मुस्लिम धर्मगुरूंनी आपल्या तकरीर (भाषण) मध्ये धार्मिक शिक्षण, मुस्लिम एकता, सामाजिक एकजूट, आपसी प्रेम, सर्व धर्मांप्रती सन्मान आणि महिलांचा आदर यावर भर दिला. तसेच, एक चांगला आणि प्रामाणिक माणूस कसा असावा, लहान मुलांचे धार्मिक शिक्षण व संस्कार, अशा सवयी आणि वागणूक ज्यामुळे आई-वडिलांचे मन दुखावले जाऊ नये, सर्व धर्मांमध्ये माणुसकीचे नाते टिकून राहावे, आई-वडिलांची सेवा, गुरुजनांचा सन्मान आणि पैशांचा योग्य वापर यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आणि संदेश दिले गेले.  

या इज्तेमामध्ये नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील लोकांनी सहभाग घेतला. भंडाऱ्यातील तरुण, मुले, वृद्ध तसेच रेल्वे विभाग, पोलीस विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग, जनरल हॉस्पिटल इत्यादींनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.  

यासंदर्भात माहिती व्यवस्थापन समितीच्या वतीने मुफ्ती मोहम्मद साजिद यांनी दिली.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या