Ticker

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींन कडून लाडक्या भावाचा शिवसेना महिला मेळावा घेऊन व केक कापून वाढदिवस साजरा.

चित्रा न्युज प्रतिनिधी
बल्लारपूर - शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी च्या जिल्हा प्रमुख सौ. मीनल ताई आत्राम यांच्या वतीने महिलांचा मेळावा घेण्यात आला. 
या बाबत सविस्तर वृत्त असे कि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या सुभेच्या देण्यासाठी शिवसेनेच्या लाडक्या बहिणीन कडून महिलांच्या मेळावा घेण्यात आला असून सर्व महिलान कडून हळदी कुंकू चा कार्यक्रम सुद्धा करण्यात आला.
या वेळी सौ. मीनलताई आत्राम जिल्हा प्रमुख यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन करते वेळी म्हणाल्या कि महिलांच्या पाठीशी कणखर पणे उभे राहून सर्व बहिणींना सन्मान योजने अंतर्गत सर्वांना मदत करणारे आमचे लाडके भाऊ यांनी कोणते हि भेदभाव पक्षपात न करता महाराष्ट्रातील सर्व जनतेची अहो रात्र सेवा करणारे एकमेव माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्यांनी दिन दलित, शोषित, पीडित शेतकरी, शेतमजूर, कामगार, जेष्ठ नागरिक, गोरगरीब जनतेची सेवा करून अनेक योजना काढल्या व सर्वांना लाभ दिला शिवसेना पक्षाला अधिक मजबूत केले अशा आमच्या लाडक्या भावाला सर्व जनतेकडून आशीर्वाद रुपी मा. एकनाथजी शिंदे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली. शिवसेना पक्षाचा सर्व महिला पदाधिकारी लाडक्या बहिणीने केक कापून वाढदिवस साजरा केला.
बल्लारपूर गेस्ट हाऊस येथे सौ. पुनम मसराम यांनी महिला मेळाव्याचे आयोजन केले असुन सदर कार्यक्रम सौ. मीनलताई आत्राम यांचे नेतृत्वात घेण्यात आला असुन यावेळी सर्व महिलांनी मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या सुभेच्या दिल्या व साहेबांना दीर्घ आयुष्य लाभावे व शिवसेना पक्ष मजबूत व्हावे अशी ईश्वरा कडे प्रार्थना केली असुन या कार्यक्रमाला सौ. मीनलताई आत्राम शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर, सौ. कृष्णा सुरमवर विधानसभा संघटिका, बल्लारपूर, श्री. संतोष पारखी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष तथा चंद्रपूर शिवसेना तालुखा प्रमुख, सौ. पुनम मसराम शिवसेना पदाधिकारी, श्री. राम येरमे शिवसेना सदस्य, श्री. नानाभाऊ दुर्गे माजी नगरसेवक, भद्रावती, विवेक दुर्गे शिवसैनिक, निखिल सुरमवर शिवसैनिक, व इतर शिवसेना पदाधिकारी, व तसेच शेकडो महिला या कार्यक्रमाला उपस्तिथ होत्या हे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या