उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे गटविकास अधिकारी अचलपूर यांना पत्र.
चित्रा न्युज प्रतिनिधी
अचलपूर : टवलार ग्रामपंचायत हद्दीतील किरण पाटील चित्रकार यांनी मालमत्ता क्र. 420 व 421 या जागेत तार कंपाउंड करून 1222.17 चौ. फुटाचे शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे, हे चौकशीत व अहवालात निष्पन्न झाल्यानंतर हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यासाठी दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी ग्रामपंचायत टवलारच्या नावे लेखी आदेश काढलेला होता.
परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आदेशाला 4 महिन्यापासून केराची टोपली दाखवत ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी श्री अजय अंबादास देशमुख यांनी सदर अतिक्रमणवर निष्कासित करण्याची कारवाई केली नाही.
म्हणून शासकीय कर्तव्य पार पाडतांना केलेल्या कसुरीबाबत ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची व निलंबनाची कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लेखी आदेश दिलेला आहे.
आपल्या कर्तव्याचे पालन न करता, गावातील अतिक्रमणास प्रोत्साहन देऊन शासकीय मालमत्तेचे रक्षण न करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, तसेच प्रत्येक जागरूक नागरिकाने अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांविरुद्ध टोकाची भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत तक्रारकर्ते श्री इमरान पठाण (संस्थापक/अध्यक्ष युवाशक्ती ग्रामविकास संगठन) यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या