10वी व 12वी बोर्डाची परीक्षा सी.सी. टीव्ही कॅमेरे सर्वं वर्ग खोलीत लावुन परीक्षा घेण्यात यावे
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-बारावी बोर्डाची परीक्षा 11फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहेत खरोखरचं बोर्डाला परीक्षा कॉपी मुक्त घ्यावयाची असेल तर प्रथम गार्डिंग घेणाऱ्या शिक्षकां जवळ व परीक्षेच्या कामात सहकार्य करणाऱ्या शिक्षक प्राध्यापक जवळ मोबाईल राहता कामा नये तसेच गावातील महा ई सेवा केंद्र, आधार केंद्र व शाळेतील महाविद्यालयात असलेली झेरॉक्स मशीन परीक्षेच्या वेळात कुलूप बंद ठेवावेत
जिल्हा बाहेरील कर्मचाऱ्यांची भरारी पथक व बैठे पथकाची नियुक्ती करण्यात यावी सर्वं परीक्षा खोलीत व बाहेर दोनशे मीटर पर्यंत सी सी टीव्ही कॅमेरे चालू ठेवून परीक्षा घेण्यात यावी गार्डिंग वर असलेल्या शिक्षक व प्राध्यापका जवळ मोबाईल असल्यामुळे शिक्षक प्राध्यापक पाच मिनिटात विषय शिक्षकांना पेपर मोबाईलवरून सेंड करण्यात येत आहे लगेच पेपर बाहेर पडत असल्यामुळे हुशार होतकरू विध्यार्थी टक्के वारीत मागे पडत आहेत तर अभ्यास न करता कॉपी करून कमी बुद्धीचे विध्यार्थी पास होत आहेत हि सर्वं बाब बोर्डाला व कर्मचाऱ्याला माहिती असुन देखील कडक भूमिका घेतली जात नाही दरवर्षी बोर्ड गाजा वाजा करतोय कॉपी मुक्त परीक्षा घ्यावयाची आहे मात्र कडक भूमिका घेतली जात नाही
मोबाईल मुळे येणाऱ्या पथकाची माहिती सेकंड मध्ये मिळत आहे भरारी पथकाने खाजगी वाहनाचा वापर करून अचानक परीक्षा केंद्रावर गेल्यावर पथकाला कॉपी च कॉपी दिसेल खरोखरचं देशात चांगले नागरीक, देश सेवा करण्यासाठी आय पी एस, आय ए एस सारखे हुशार देश सेवा करण्यासाठी मुले घडवायचे असेल तर इमानदारीने परीक्षा घ्याव्यात व शासनादेशाचे तंतोतंत पालन व्हावे.
एकंदरीत होऊ घातलेली परिक्षा येथील सेंटरवर काॅपीमुक्तीच्या जागरामध्ये होणार का, काॅपी बहाद्दरांच्या गोंधळात होणार? याकडे हाळीसह सुकणी,मोरतळवाडी, वडगाव आदी गावातील परिक्षार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे..
कारण,हंडरगुळीचे केंद्र हे काॅपीसाठी एकदम "सेफ" व "फेमस" आहे !!
0 टिप्पण्या