Ticker

6/recent/ticker-posts

”मृत्यूजंय दूत पुरस्कार“ - अपघात समयी मदत करणाऱ्यांचा सन्मान



 
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:- मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून दळणवळण सुलभ होण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते बांधणी सुरू आहे. यामुळे वाहनांना चांगल्या प्रकारचे रस्ते व सुविधा मिळत असल्याने प्रवासांचा वेळ कमी झाला आहे. तसेच रस्त्यावर अपघात देखील होत आहेत.रस्ते अपघातामध्ये अपघात मिळाल्यानंतर जखमींना वेळीच मदत मिळाल्यास तसेच वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्यांचा प्राण वाचू शकतात. अपघातामध्ये वेळीच व तात्काळ मदत करणारे इसमांचे कौतूक करण्यासाठी *मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी *‘‘मृत्यूजंय दूत’’*  हा पुरस्कार सुरू केला आहे. त्यामध्ये महिनाभरामध्ये जिल्ह्यातील अपघातामध्ये मदत करणारे नागरिकांचा  प्रशांसापत्र देवून गौरव करण्यात येत आहे. 
      
 दिनांक 03/02/2025 रोजी श्री. विनोद भास्कर भोसले,प्रदीप शहाजी कदम  रा. लवंग, ता. माळशिरस हे आपल्या मोटार सायकलवरून टेंभूर्णीहून अकलूजकडे जात असताना जांभूळबेट पाटीजवळ एक इसमास अज्ञात वाहनाने धडक देवून गंभीर जखमी केले होते. तो इसम जखमी अवस्थेत विव्हळत पडला होता. तेथे बऱ्याच बघ्यांची गर्दी जमली होती. परंतू श्री. विनोद भोसले यांनी तेथील परिस्थीती पाहून अॅब्युलन्सचा टोल फ्री क्रमांक 108 वर फोन करून अॅब्युलन्स घटनास्थळावर बोलावून जखमीस उचारासाठी रवाना केले. तसेच त्याबाबतची माहिती पोलीसांना देखील दिली. त्यांच्या या कार्यास देखील ‘‘मृत्यूजंय दूत’’ पुरस्कार देण्यात आला आहे. 
       सदर दोन्ही पुरस्कार विजेत्यांना आज दिनांक 13/02/2025 रोजी मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी मासिक गुन्हे सभेमध्ये बोलावून त्यांना प्रषंसापत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत केले आहे. तसेच अपघातामध्ये मदत करणारे लोकांना पोलीस तपासाची कोणताही त्रास होणार नाही याची हमी पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
       सदरवेळी मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर गामीण, जिल्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या