Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी
 सोलापूर :-श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती अकलूजमध्ये विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.
जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आज दिनांक १२.२.२०२५ रोजी सकाळपासून नामस्मरण, भजन, प्रवचन, पुष्पृष्टी, महाआरती
घेण्यात आली. याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच  किशोरसिंह माने पाटील, पीपल्स रिपब्लिक पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले, वीरशैव समाज संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक. चंद्रकांत शेटे, सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डी. जी. कांबळे, परीट समाज संघटनेचे शांतीलाल कारंडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याचे
मानकरी सुरेश देशपांडे, अकलूज येथील डॉ. संतोष खडतरे, डॉ. दिलीप गुजर माळशिरस तालुका आय एम ए चे अध्यक्ष डॉ.
संजय सिद या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर सोहळ्यामध्ये सुहास उरवणे यांनी रविदास
महाराजांचे विचार व शिकवण यावर प्रबोधन केले. कार्यक्रमाच्याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच . किशोरसिंह
माने पाटील यांनी समाजाबद्दल गौरवोद्गार काढले व श्री संत रविदास महाराज यांचा जयंती सोहळा अतिशय शिस्तबद्ध व
समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन साजरा केला जातो, ही बाब अतिशय उल्लेखनीय आहे. असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
जयंती सोहळ्याच्या निमित्ताने रक्तदान शिबीरामध्ये २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच समाजातील सेवानिवृत्त, सेवा बढती
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि येथोचीत सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम
अकलूज मधील लक्ष्मी बालाजी हॉल येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दिलीप गुजर,  आबासाहेब
शिंदे,  अशोक कांबळे, . बाबुराव भगत, बंडू खडतरे, अॅड. भारत गोरवे, सुभाष शिंदे, मोहन भगत, गोपाळ मस्तुद, अशोक
राजगुरू, नितीन लोखंडे, महादेव राजगुरू, प्रदीप राजगुरू, अनिल शिंदे, हनमंत तेलसंग, चंद्रकांत राजगुरू, अशोक शिंदे,
विलास शिंदे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शैलजा गुजर, संगीता खडतरे, विद्या शिंदे यांच्यासह समाजातील अनेक महिला उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महाप्रसादाचे आयोजन  रोहिदास शंकर कांबळे व. रतन रोहिदास कांबळे यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी समाजातील सुमारे ८०० समाज बांधव उपस्थित होते. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन  राजाराम गुजर यांनी केले तर बंडू खडतरे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या