Ticker

6/recent/ticker-posts

अखेर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालकांचे पॅनल परीक्षेचे अंतिम निकाल घोषित..!

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल तयार करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाकडून शासन निर्णय दि 18/4/2022 रोजी  पारित करण्यात आलेला होता. सदर शासन निर्णयानुसार सविस्तर परिपत्रक राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून दि 31/5/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. इक्षुदंड ते इथेनॉल प्रवास करणाऱ्या व वेगाने बदलणाऱ्या राज्यातील साखर उद्योगाच्या व्यवस्थापनाची धुरा सक्षम पणे पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक  कार्यक्षम असणे गरजेचे आहे या संकल्पनेतून कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेत आमूलाग्र बदल करणेचा निर्णय तत्कालीन साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांनी घेतला होता. सदर निर्णयानुसार कार्यकारी संचालकांची परीक्षा प्रथमच पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये घेणेचा निर्णय करण्यात आला होता. पहिल्या टप्प्या तील चाळणी परीक्षा दि 5 एप्रिल 2024 रोजी, दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा दि 4 मे 2024 रोजी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी परीक्षा दि 19 जुलै ते 22 जुलै दरम्यान वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान, पुणे येथे घेण्यात आल्या होत्या. मौखिक चाचणी परीक्षा चालू असतानाच लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी निवड प्रक्रिया सदोष असलेचे कारण पुढे करून मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका क्र 7267/2024 दि 8 जुलै 2024 रोजी दाखल करून निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते. सदर याचिकेवर सविस्तर प्राथमिक सुनावणी होऊन मा उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी दि 18 जुलै 2024 रोजी आदेश पारित करून मौखिक चाचणी परीक्षा घेणेस अनुमती दिली होती तथापि लेखी परीक्षेचे उमेदवारांचे गुण बंद लिफाफ्यामध्ये उच्च न्यायालयात सादर करणेचे व परीक्षेचे अंतिम निकाल प्रसिद्ध न करण्याच्या सूचना साखर आयुक्त कार्यालय व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान यांना दिले होते. तदनंतर या ना त्या अशा अनेक कारणांमुळे सदर याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडलेली होती तथापि सदर याचिके वरील अंतिम सुनावणी दि 20 जानेवारी 2025 रोजी न्यायमूर्ती संजय मेहरे व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचे खंडपिठासमोर पार पडली. सुनावणी दरम्यान निवड प्रक्रियेला आव्हान दिलेल्या अनेक याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे दाखले वादी व प्रतिवादी यांचेतर्फे कोर्टात सादर करून जोरदार युक्तिवाद पार पडला होता .सुमारे साडे चार तास चाललेल्या सदर सुनावणीत निवड प्रक्रियेस आव्हान देणारी याचिका मा. उच्च न्यायालयाकडून दिनांक 07/02/2025 रोजी फेटाळण्यात आल्याने कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेचे अंतिम निकाल दि.   10/2/2025  रोजी प्रसिद्ध करण्यात आले. सदर न्यायप्रविष्ट कायदेशीर प्रक्रिया लवकर पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे राज्याचे तरुण व अभ्यासू साखर आयुक्त श्री कुणाल खेमणार सो, तत्कालीन साखर संचालक श्री राजेश सुरवसे, सहसंचालक श्री मंगेश तितकारे, साखर आयुक्त कार्यालयाचे सर्व अधिकारी वर्ग, वैकुंठ मेहता प्रबंधन संस्थान चे सर्व पदाधिकारी, शासनाला मार्गदर्शन करणारे सरकारी विधिज्ञ्, इतर सर्व ज्येष्ठ विधिज्ञ्, साखर उद्योगातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांचे आभार व उत्तीर्ण उमेदवारांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या