चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-आपल्या धडाकेबाज कामगीरीमुळे गुन्हेगारी व अवैध धंदेवाल्यांच्या उरात धडकी भरवलेले व खाकीची दहशत निर्माण केलेले आयपीएस तथा नांदेड परिक्षेञाचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दि.१२/२/२५ उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाण्याला भेट दिली.आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषजी कल्याणकर हे अधिकारी ही त्यांच्या समवेत होते. वार्षीक पहाणी {इन्सपेक्शन} करण्यासाठी शहाजी उमाप व सोमयजी मुंडे यांचे आगमन झाले. यावेळी सपोनी.बी. एस.गायकवाड,पोउपनी.एम.के. गायकवाड,पोउपनी टोपाजी कोरके यांनी वरीष्ठांचा -हदय सत्कार केला. व या ठाण्याच्यावतीने वर्षभरात केले गेलेल्या कामांची माहिती ही देण्यात दिली.यावेळी हे.काॅ. संजय दळवे, शिवप्रताप रंगवाळ,एम.एम.केंद्रे. शिवाजी केंद्रे,गोरख कसबे, दयानंद सोनकांबळे,संजय कलकत्ते,बालाजी अक्केमोड,ईकराम उजेडे,शिवाजी सोनवणे,राजमहंमद शेख, वाडकर आदी पोलीस कर्मचारी व हद्दीतील पोलीस पाटील,महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
वाढवणा पोलीसांच्या कामगीरी विषयी वरीष्ठांनी समाधान व्यक्त केले
*हंडरगुळीचे पञकार विठ्ठल पाटील यांनी दिली शहाजी उमाप यांना छ.शिवरायांची प्रतिमा भेट*
वाढवणा पोलीस ठाण्याची वार्षीक तपासणी करण्यासाठी व पोलीसांनी केलेल्या कार्याचा आढावा / माहिती घेण्यासाठी नांदेड परिक्षेञाचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक मा.शहाजी उमाप हे दि.१२ रोजी आले असता त्यांचा जेष्ठ पञकार विठ्ठल पाटील यांनी छञपती शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.
*निकेतन कदम यांच्या सिंघमगीरीची आठवण* ताजी झाली आहे.
कारण,लातुरचे तत्कालीन आयपीएस. पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी चाकुर,अहमदपुर,वाढवणा ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडाकेबाज कामगीरी करुन काळे धंदे व गुन्हे करणा-यांना सळो की पळो करुन सोडले होते.विशेष करुन हाळीत निकेतन कदम यांनी अनेकदा गुटखा, मटका व पत्यांचा क्लब यावर धाडी टाकुन यातील आरोपींना कायद्याची "सुंदरी" दाखवली.तसेच क्लबच्या धाडीतील आरोपींची धींड काढली आणि राज्य मार्गालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना भाग पाडले होते.या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अवैध धंदेवाल्यांच्या मनात पोलीस खात्याची दहशत तर बसली होतीच.पण आदर ही वाढला होता.अशा या कामगिरीमुळे समस्त हाळी-हंडरगुळीकरांनी निकेतन कदम यांना "सिंघम" हे नाव बहाल केले आहे.आणि आज शहाजी उमाप यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे निकेतन कदम यांच्या सिंघम गिरीची आठवण जनतेला येत आहे.
0 टिप्पण्या