Ticker

6/recent/ticker-posts

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबितपी.आय घोरबांड उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत !

सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळेल का ? 
सरकार आरोपींना वाचवतय का ?

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणात शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणारा पोलिस अधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचा फोटो समाज माध्यमावरून समोर आला आहे. त्यामुळे सुर्यवंशी कुटुंबियांना खरचं न्याय मिळेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळील संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाने विटंबना केली. यानंतर आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन महिला, वृध्द, युवक यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करून अटक करण्यात आली, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पी. आय. घोरबांड यांच्या आदेशाने हा सर्व प्रकार झाल्याचे दिसून आले.

संविधानाच्या विटंबना केली म्हणून आंदोलन करणारे कायद्याचे विद्यार्थी असणारे सोमनाथ सूर्यवंशी सहभागी होते. त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांचा पोलिसांच्या जबर मारहाणीत मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकारी घोरबांड हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतानाचा फोटो सध्या समाज माध्यमांवर वायरल झाला, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा फोटो असल्याने सूर्यवंशी कुटुंबियांना न्यायापासून वंचित राहावं लागेल, आंबेडकरी वस्त्यांत अमानुष मारहाण झालेल्या नागरिकांनाही न्याय मिळणार नाही, कारण आरोपीच्या आणि प्रकरणातील दोषींच्या पाठीमागे सरकार असून आरोपींना वाचवण्याचे काम शासन करत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या