Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य उपकेंद्र कोकळगाव येथे गप्पी मासे पैदास केंद्राचा शुभारंभ

चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-प्रा.आ.केंद्र मदनसुरी अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकन गुनिया या किटकजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे पैदास केंद्राचा शुभारंभ मा.सरपंच श्री.गुरुलिंग वाकडे साहेब तसेच पत्रकार श्री.द्रोणाचार्य कोळी साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.कांबळे सर, सहशिक्षक श्री.सगर सर यांच्या हस्ते गप्पी मासे सोडून करण्यात आला यावेळी ग्रामस्थ कोकळगाव उपस्थित होते.
           कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये विविध रोगांच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्यास उपयोगी पडतील. जैविक उपायोजनेअंतर्गत किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे हिवताप व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये मदत म्हणून ही मोहीम राबविल्या जाते अशी माहिती व आरोग्य शिक्षण यावेळी ग्रामस्थांना देण्यात आले.
         गप्पी मासे पैदास केंद्र निर्मिती मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.संजय पवार सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप जाधव सर व वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहिणी जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
          गप्पी मासे पैदास निर्मिती करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत रूमणे, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के.जाधव, सेविका श्रीमती.कमलबाई सूर्यवंशी व आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या