Ticker

6/recent/ticker-posts

सुकणी जवळील सिमेंट रोडला पडल्यात भेगा.


चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-कांही महिण्यापुर्वी सुकणी येथील नव्याने बनवलेल्या सिमेंट रोडवर मोठमोठ्या भेगा पडल्याचे दिसतेय. व या कामात मोठा गडबड घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येईना.आणि तरीही यावर कारवाई करणारी यंञणा व संबंधित ठेकेदार हे तुझ्यागळा-माझ्यागळा! असे तर म्हणत नाहीत , ना? असा प्रश्न जाणकार सुकनीकरांमधुन चर्चीला जात आहे.
उदगीर तालुक्यातील सुकणी या गावातुन नांदेड-बिदर हा राज्यमार्ग गेला असुन,या रोडवरुन लोडेड-ओव्हलोडेड असे हजारो वाहने धावतात.या ठिकाणी पुर्वी डांबरी व अरुंद रोड होता.आणि तो खुप खराब झाला होता.म्हणुन संबंधित खात्याने कांही महिण्यापुर्वी त्याच ठिकाणचे रुंदीकरण व सिमेंटीकरण केले.माञ सदरचे काम हे अत्यंत बोगस झाल्याचे रोडवरच्या भेगा पाहुन म्हटले जाते.भविष्यात याच भेगा खुप मोठ्या होऊ शकतात!तरीही या बोगस कामाची चौकशी व नव्याने दुरुस्ती करण्याची तसदी सा.बां.खाते घेईना. म्हणुन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यात अर्थपुर्ण नातेसंबंध असतील अशी कुजबूज सुकणीकर करताहेत. 

सिमेंट रोडची सुरुवात व शेवट ही डेंजरच..!!
 जुन्या डांबरीरोडचे कांही महिण्यापुर्वी रुंदीकरण करुन त्यावर सुरुवात  व शेवट केलेल्या  सिमेंटरोडच्या जागी मोठा अपघाती घड्डा पडल्याचे दिसते.तसेच भल्या मोठ्या व लांबचलांब भेंगाही पडल्या असल्याचे दिसतात.तेंव्हा संबंधित खात्याच्या वरीष्ठ अधिका-यानी या कामाची पाहणी करुम योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी आहे.


सदरील कामाची पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल.अशी माहिती एल.डी.देवकर,उपअभियंता,सा.बां.विभाग उदगीर* यांनी फोनवरुन दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या