चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज महाविद्यालयात दिनांक ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दि.६ फेब्रुवारी रोजी सदर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. अनिल भानवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज या संस्थेचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन सर्वांगीण विकास करणे असल्याने, महाविद्यालयामध्ये दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते .
यामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, रस्सीखेच, मुलींसाठी थ्रो बॉल तसेच ॲथलेटिक्स प्रकारा मधील धावणे, ४×१०० रिले, थाळीफेक, गोळाफेक इत्यादी क्रीडा प्रकार तसेच इनडोअर खेळांमध्ये बॅडमिंटन, बुद्धिबळ इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धांमध्ये अंतिम वर्ष बी.फार्मसी वर्गातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवत स्पोर्ट चॅम्पियनशिप चा सन्मान पटकावला व द्वितीय वर्ष बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेता होण्याचा मान पटकावला. तसेच तृतीय वर्ष बी.फार्मसी व प्रथम वर्ष बी.फार्मसी वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे सचिव श्री. अभिजीत रणवरे यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रोत्साहन दिले.
महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल राजेघाटगे, प्रा.महेश मिटकल, प्रा.प्रवीण दुपडे, प्रा. रविराज जळकोटे, प्रा. शेखर कवठेकर, प्रा. बापू अंकलगी, प्रा. प्रशाली शिंदे, डॉ.स्नेहल काशीद, डॉ. रेश्मा पवार प्रा. शुभांगी खरात,प्रा. नूतन दुधाळ प्रा.ऐश्वर्या फुटाणे, प्रा. संजीवनी सावंत याच बरोबर श्री. समाधान दुरापे, श्री. दत्तात्रय कोळी, सौ.सुषमा शिंदे, सौ.गिरीजा साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह मोहिते- पाटील, अध्यक्ष मा.श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेच्या संचालिका मा.कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव श्री.अभिजीत रणवरे, सहसचिव श्री.हर्षवर्धन खराडे-पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. विनोद कुमार दोशी व सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


0 टिप्पण्या