Ticker

6/recent/ticker-posts

गळ्यात निळी पट्टी टाकली म्हणजेस्वतःला आमचे मालक समजता का?

वंचितचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांचा सुरेश धसांना इशारा 

चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी बळी घेतला. त्या पोलिसांना माफ करा असे गाढवपणाचे वक्तव्य करणाऱ्या सुरेश धस यांचा वंचित बहुजन आघाडीने खरपूस समाचार घेतला आहे. गळ्यात निळी पट्टी टाकली म्हणून स्वतःला बहुजनांचे मालक समजण्याची चूक करू नका. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला आहे. 

सुरेश धस यांनी यानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संदर्भात काय वक्तव्य केलं, तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते किंवा वडार समाजाचे कार्यकर्ते तुमचा संपूर्ण महाराष्ट्रात समाचार घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

अनिल जाधव यांनी म्हटले आहे की, परभणी घटनेच्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी एक विधान केले. एकाला एक न्याय, दुसऱ्याला एक न्याय अशी भूमिका त्यांची दिसली. त्यांच्या पोटातलं ओठावर आलं. जातीवादी कसा असतो याचे उदाहरण म्हणजे सुरेश धस आहेत. पोलिसांना माफ करा असं म्हणायचा सुरेश धस यांचा संबंधच काय, तुम्ही काय बहुजनांना विकत घेतलं आहे का ? असाही सवाल त्यांनी केला आहे. 

रोज काहीही वक्तव्य करून चर्चेत राहायचं हे सुरेश धस करत असतात. पण हे करत असताना आपणही मुलाचे बाप आहात, तुमच्या मुलाला पोलिसांनी मारून टाकलं असत, तर तुम्ही मोठ्या मनाने पोलिसांना माफ केले असते का ?  असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात जर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी लक्ष घातलं नसतं, तर हे प्रकरण दडपून टाकलं असतं असेही जाधव यांनी नमूद केले.

सुरेश धस यांनी पुन्हा अस वक्तव्य केलं, तर या महाराष्ट्रातील भटके विमुक्त, फुले -शाहू - आंबेडकरवादी जनता तुमच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत जाधव यांनी धस यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या