चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :- उदगीर तालुक्यात मोठे गाव हाळी व हंडरगुळी या गावातुन आंन्ध्रा , कर्नाटक व तेलंगणा या परराज्यांना जोडणारा नांदेड- बिदर हा राज्यमार्ग गेला आहे.म्हणुन या रोडवर दररोज हजारो लहान-मोठे वाहने धावतात.व याच राज्यमार्गावर रोज लहान-मोठी हजारो वाहने बेशिस्तीत थांबलेली दिसतात.तसेच याच रोडवर सा.बां.खात्याच्या जागेत कांहींनी केलेल्या अतिक्रमणांमुळे तसेच बेशिस्तीत थांबलेल्या वाहनांमुळे सतत रोड जॅम होऊन वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजल्याचे चिञ नेहमीचेच झाले आहे.तसेचदर रविवारी चार,पाचदा वाहतूककोंडी होते! तसेच या वाहनांमुळे व अतिक्रमणांमुळे व्यापारी आणि पदचारी वैतागले आहेत. याविरुध्द आवाज उठवुन संबंधितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ही केला.तरीही याकडे कुणीही लक्ष देत नाही. येथे एखादा अपघात झाल्यावरच संबंधित खाते, यंञणा कारवाईचा बुलडोझर चालवणार आहेत काय ? एकंदरीत या प्रकारामुळे राज्यमार्गा सह व्यापारी जनतेचा श्वास गुदमरला आहे. 3 राज्यांना जोडणारा हा राज्य मार्ग असल्याने येथे वर्दळ असते. वाढलेले अतिक्रमण व रोडवर अस्ताव्यस्त, वाकडी- तिकडी उभा असलेले वाहने,हातगाडे यांच्यामुळे हाळी-हंडरगुळीत वाहतूकीचे बारा वाजल्याचे जनतेला दिसते.माञ, संबंधितांना दिसेना ! याचेच जनतेतून आश्चर्य व्यत्क होत आहे .
राज्यमार्गावर थांबलेली वाहने हाळी व हंडरगुळी येथून मोटारसायकवरुन उदगीर- शिरुर रोडकडे वळताना समोरुन आलेले वाहन दिसत नसल्याने अनेकदा अपघात झालेत.जिल्ह्यातील अनेक ठाण्यात अशा प्रकारे वाहतूकीला अडथळा ठरणा-या वाहनांच्या नंबर प्लेटचा फोटो मशीनने काढून पोलीस यंञणा कर्तबगारी,कारवाही करताना दिसते.परंतू हाळी-हंडरगुळीत रोज शेकडो अल्पवयीन वाहनचालक पोरं वाहतूकीचे व कायद्याचे "बारा" वाजविताना दिसतात. परंतू संबंधित यंञणा आपली जिम्मेदारी , कर्तबगारी निभावताना का?दिसत नाही . हे एक कोडेच जनतेला सतावत आहे . आजवर येथे कुणीही कसलीही दंड वा कारवाई केली नाही. यामुळे राज्य मार्गालाच अनेकांनी वाहनतळ तयार केले असून, अपघाताची वाट बघत बसण्याऐवजी कारवाईची "लाठी" चालवावी.अशी मागणी होत आहे ..
वरीष्ठांनी येथे येऊन कारवाहीची 'सुंदरी' चालवायला सुरुवात केली की मग आम्ही पण कारवाहीची 'सुंदरी' कशी असते ती बेशिस्तीत उभा असलेल्या व वाहतूकीस अडथळा ठरत असलेल्या वाहनांना व अल्पवयीन चालकांना दाखवुन देऊ!अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलीसानी दिली आहे
वाहतूक नियम मोडणा-यांवर कारवाई करण्याचा नियम,कायदा शहरासह खेडे गावासाठी एकच आहे.म्हणुन नियमांची पायमल्ली करणा-या सर्वच वाहनांवर लवकरच दंडात्मक कारवाई करणारच. अशी माहिती सपोनी.बी.एस.गायकवाड यांनी दिली


0 टिप्पण्या