Ticker

6/recent/ticker-posts

निपॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने 24 मार्च पासून धरणे आंदोलन


चित्रा न्युज  प्रतिनिधी  

 भद्रावती : येथील  मोठी एम आय डी सी  येत असलेल्या ग्रेटा व न्यू इरा या कोल गॅसिफिकेशन कंपनीने सानुग्रह अनुदान, नोकरीची हमी देऊन त्रिस्तरीय लेखी करार देण्यात यावा या प्रमूख मागण्या संदर्भात अजूनही शासन दरबारी दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाचा पवित्रा घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचे ठरविले आहे.
 शहरातील तहसील कार्यालया समोरील नागपूर चंद्रपूर रोड लगत दिनांक २४ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान हे आंदोल सुरू राहणार असून यात विंजासन, गवराळा, तेलवासा, ढोरवासा, पिपरी, चिरादेवी, चारगाव येथील प्रकल्पग्रस्त सकाळी १०ते सायंकाळी ६.००वाजेपर्यंत महिला  पुरुष व मुलाबाळसहीत क्रमाक्रमाने सहभागी होणार आहेत.
  वेळोवेळी निवेदन देऊन, चक्क विधानसभा, विधान परिषद येते प्रश्न उपस्थित करून, आणि दिनांक.१७ तारखेला भव्य मोर्चा द्वारे विरोध दर्शवून सुध्दा कुंभकर्णी झोपेतील प्रशासन जागे न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
सदर धरणे आंदोलनाकरिता अधिकाधिक संख्येने प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे वतीने एका  प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या