प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे!
चित्रा न्युज प्रतिनिधी
पाथर्डी - पाथर्डी पंचायत समिती कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात जोरदार हंडा मोर्चा आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक महिन्यांपासून मौजे धामणगाव (देविचे) ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी निवेदन दिले, परंतु याबाबत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे तसेच ग्रामसेवक, सरपंच यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने त्यांच्या निषेधार्थ आज मौजे धामणगाव देवी येथील महिला, लहान मुले, पुरूषांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य हंडा मोर्चा काढत महापुरुषांच्या घोषणा देवून, पंचायत समिती, ग्रामपंचायत, तसेच लोक प्रतिनिधींचा जाहीर धिक्कार करत घोषणा देत पंचायत समिती कार्यालय दणाणून सोडले.
हंडा मोर्चात युवा कार्यकर्ते पप्पूसेठ बोर्डे, वंचितचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, रवींद्र निळ, हनुमान पवार, रमजान फकिर,सुनिता जाधव, रोहिणी ठोंबे,आकाश शिंदे, आबेद शेख, अरुण थोरात, राजू शिरसाठ, आनंद उबाळे, जिवन वाघाडे, सुनिता लोखंडे, शिल्पा गिरी, संगिता शिंदे,सुरेखा शिंदे, चंद्रभागा शिंदे, सविता शिंदे, हिरा पवार, मंगल पवार,काळू मिरपगार, अमोल मिरपगार, सुरेश जाधव, रेखा उन्हावणे, कमल उन्हावने व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या हंडा मोर्चा मोर्चा,आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. त्वरित टॅंकर द्वारे पाणी पुरवठा देणार आणि आठ दिवसात जलजीवन योजना सुरु करणार असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले.


0 टिप्पण्या