जिल्हाधिका-यांकडे तक्रार;ग्रामपंचायत जुगनी येथील प्रकार
चित्रा न्युज प्रतिनिधी
धडगांव:५ अपत्ये असणारे आट्या वेरांग्या वळवी,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत जुननी तालुका धडगांव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जुगनी येथील तक्रारदार अमिताभ जोमा वळवी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.याबाबत अमिताभ वळवी यांनी गटविकास अधिकारी धडगांव यांच्याकडे १७ ऑक्टोबर २०२४ व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रार अर्जात म्हटले आहे की, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२३ मध्ये आट्या वेरांग्या वळवी यांना ५ अपत्ये हयात असतांना आपल्याला फक्त २ अपत्ये आहेत, अशी खोटी माहिती नामनिर्देशन फाॅर्म मध्ये भरून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुक लढवली व खोट्या माहितीच्या आधारे निवडणुक जिंकली.आट्या वेरांग्या वळवी यांना राकेश,करिना,कल्पेश,कल्पना ,श्रावण अशी ३ मुले व २ मुली एकूण ५ अपत्ये आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांस २ पेक्षा अधिक अपत्ये असू नयेत, अशी अट असतांना आट्या वेरांग्या वळवी यांनी नामनिर्देशन फाॅर्म मध्ये आपल्याला फक्त २ अपत्ये आहेत,अशी खोटी माहिती भरून निवडणुक आयोगाची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे,म्हणून त्यांचे तात्काळ ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करा व शासननिर्णयानुसार कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी तक्रारदार अमिताभ वळवी यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.


0 टिप्पण्या