चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर : माढा तालुक्यातील बुद्रुक वाडी येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी शाखा अध्यक्ष कांतीलाल माने यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.
आज वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, राज्याचे प्रवक्ते डॉ. अरुण आबा जाधव, सोलापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण आणि सर्व विभागाचे पदाधिकारी असे एक शिष्टमंडळाने आज कांतीलाल माने यांच्या कुटुंबीयांना सांत्वन पर भेट देऊन विचारपूस केली.
त्यानंतर माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बंडगर यांना निवेदन देऊन या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची विनंती करण्यात आली. याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या