Ticker

6/recent/ticker-posts

उदगीरच्या माऊली काॅलेजच्या स्टूडंट्सनी कुलूमनालीला भेट दिली"

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथील माऊली काॅलेज आॅफ अॅग्री च्या स्टूडंट्सनी जागतिक महिला दिनी "ताजमहल" ला भेट देऊन पाहणी केली.
तोंडार पाटी लगतच्या माळावर माऊली काॅलेज असून येथे bhms डाॅक्टर,फार्मसी व अॅग्री आदींच्या शिक्षणाची सोय आहे.
 भारतातील सुप्रसिध्द असलेल्या देवी देवतांच्या मंदीरास भेट देऊन दर्शन घेण्यासाठी तसेच जगप्रसिध्द तसेच जगात 7 वे आश्चर्य असलेल्या "ताजमहल" ची ही पाहणी करणार व तसेच व्रंदावन, मथुरा, दिल्ली ,इंडिया गेट आदी ठिकाणाच्या प्रेक्षणीय स्थळास भेट देण्यासाठी माऊली काॅलेज आॅफ अॅग्री मधील कांही प्राध्यापक व स्टूडंट्स गेले असून,जागतिक महिला दिनादिवशी जगप्रसिध्द असलेल्या *"ताजमहल"* ला भेट देऊन पाहनी केली.व दि.९ रोजी हि टीम मधूरा व व्रंदावनकडे रवाना झाली.व १४ रोजी कुलूमनालीला भेट दिली.
*वडिलांनी सपोर्ट केल्यानेच जागतीक महिला दिनी मला टुरवर जाता आले आणि कुलूमनाली,मथुरा,इंडियागेट येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर जागतिक पातळीवर सुप्रसिध्द व जगातील ७ वे आश्चर्य असलेला "ताजमहल" पण पाहण्याचा योग आला* मानसी पाटील {विद्यार्थीनी}
*सर्वञ महिला दिन साजरा झाला.अन् या निमित्ताने माऊली काॅलेज तर्फे कांही प्राध्यापक सर व विद्यार्थी सहकारी मैञींनींसह आम्ही १५ दिवसांच्या भारत दौ-यावर गेलो असून,महिला दिनी ताजमहल पाहीला.व दि.९ रोजी मथुरा,व्रंदावन आणी १४ रोजी कुलूमनाली पाहिलोत.तसेच अनेक प्रेक्षणीय स्थळांना व मंदीरांना पण भेटी देणार आहोत.याकामी फॅमिलींनी खुप मदत केली* पल्लवी मरशिवणे स्टूडंट..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या