चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : वंचित बहुजन महिला आघाडीची पुणे जिल्हा, जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी यांची आढावा बैठक वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव अरुंधतीताई सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सदस्य रोहिणीताई टेकाळे, सचिव अनिताताई सावळे, सदस्य निर्मलाताई वनशिव उपस्थित होत्या.
पुणे शहराचा आढावा महिला आघाडी शहर अध्यक्षा अनिताताई चव्हाण व महासचिव सारिका फडतरे यांनी सादर केला. यावेळी पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष प्रतिभा कांबळे, कोमल शेलार या उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या