Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्ष पदी कवी उमेश बारहाटे यांची निवड करण्यात आली


श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
हिंगोली 

पुर्णा :-येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉ आंबेडकर नगर येथे रविवारी 9 मार्च 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड बोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष तुकारामजी ढगे सरचिटणीस गौतम दिपके संघटक एॅड सिद्धार्थ खरे यांची उपस्थिती होती कार्यकारिणीत पुर्णा शहर अध्यक्ष पदी बौद्धाचार्य तथा कवी गायक उमेश बारहाटे यांची निवड करण्यात आली सरचिटणीस पदी रत्नदीप एंगडे कोषाध्यक्षपदी मनोज सिताराम मुळे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या बैठकीला तुकारामजी ढगे गौतम दिपके सिद्धार्थ खरे यांनी मार्गदर्शन केले सुत्रसंचलन प्रा.गौतम गायकवाड यांनी तर आभार राहुल कचरे यांनी केले बैठक यशस्वीतेसाठी सोपान खरे राजू गायकवाड केशव मकासरे ईश्वर वेडे भास्कर वाघमारे राहुल भगत गिरीश ए़ंगडे राहुल गायकवाड राहुल आहिरे सुनील मगरे शंकर जोंधळे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या