Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा येथील संगीतकार केशव खोब्रागडे यांना विदर्भ रत्न पुरस्काराने सम्मानित

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडरा :-23 मार्च 2025 शहीद दिनानिमित्त अमरावती येथे भंडारा येथील संगीतकार केशव खोब्रागडे यांना विदर्भ रत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून कार्यरत केशव यांनी विविध प्रोजेक्ट तील गीतांना संगीत दिले असून ते सेंट पीटर्स स्कुल बेला भंडारा येथे संगीत शिक्षक पदावर कार्यरत आहेत.त्यांनी केलेल्या संगीत दिग्दर्शनाच्या कार्यासाठी केशव खोब्रागडे यांना ज्ञान उदय फॉउंडेशन, 7 वंडर्स रेडिएन्ट tylent बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाचे सिहं सेना चे सरदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे, केंद्र सरकारचे सचिव शैलेश चोरागडे, रेल्वे पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, पंजाबचे आंतरराष्ट्रीय चिकित्सक डॉ गुरुजीत सिग ब्रार, आयएएस मिशन संचालक डॉ नरेशचंद्र कोठाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे डॉ पंढरीनाथ रोकडे मंचावर उपस्थित होते.
आर टी बी आर चे संस्थापक व निरामय पुणेचे संचालक डॉ सुनील सातवे, कर्यक्रमाचे संयोजक डॉ क्रांती महाजन प्राचार्या सुधीर महाजन अमरावती यांची विशेष उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या