चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-झाडे लावा,झाडे जगवा असे म्हणत दरवर्षी झाडांवर करोडों रुपये शासन खर्च करीत असते.तरीही झाडांची कत्तल कांही केल्या कमी होईना. पण उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावातील *चि.प्रेम पप्पू पाटील* {इ.५ वी.वय ११ वर्ष} या चिमुकल्याने शासनादेशाचे पालन करीत घरच्या गॅलरीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या झाडांचे संवर्धन / जतन करण्यासाठी सलाईन मधून पाणी देण्याची सोय केली आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हांमध्ये ही सर्व झाडे टवटवीत दिसतात.आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे पाण्याची मोठी बचत होत असल्याचे दिसते.
गतवर्षी ऐन उन्हाळ्यात रोडवर पडलेल्या चिमणीच्या पिलाला घरी आणुन त्यास चारा-पाणी देऊन प्रेम पाटील याने जिवनदान दिले.आणि मग त्या पिलाला निर्सगात सोडले होते.हे विशेष..
सध्या आणि एप्रील,मे महिण्यात जाणवणारा ऊन्हांचा चटका पाहता घरगुती तसेच शेतातील झाडं जगणे म्हत्वाचे आहे.आणि यासाठी पाणी लागते.म्हणुन पाण्याचे व झाडांचे म्हत्व काय असते?याची जाणीव अनेकांना उन्हाळ्यातच होते.
0 टिप्पण्या