Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य उपकेंद्र कोकळगाव येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-आरोग्य विभागाच्या वतीने सन 2025 अखेर देशातून क्षयरोगाचे दुरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व या कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी 'टीबीमुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून गावातील लोकांना आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करण्यात आली तसेच जे क्षयरुग्न उपचाराने बरे झाले त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वर्षीच्या (National Tuberculosis Day) जागतिक क्षयरोग दिनाची 2025 ची “होय! आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो: प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या” ही थीम, क्षयरोगाचा अंत करण्यासाठी वापरली जात आहे.
             या सर्व कार्यक्रमांचे आयोजन मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप जाधव सर, प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहिणी जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सरपंच श्री.गुरुलिंग वाकडे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी श्री.ढवण साहेब उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन डॉ.अभिजीत रूमणे, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के जाधव, सेविका श्रीमती.कमलबाई सूर्यवंशी, तसेच आशा स्वयंसेविका श्रीमती.चमाबाई सूर्यवंशी,यास्मिन शेख,रचना जगताप,लता कांबळे,निर्मला कांबळे यांनी केलं. जिल्हा परिषद कोकळगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिपक कांबळे सर, सहशिक्षक श्री.व्ही.एस.चामे सर, श्री.एम.आय.तांबोळी सर, श्री.एच.आर सगर सर, श्रीमती.वंदना कांबळे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा पद्धतीने क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.

क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमार्फत हवेतून विशेषतः खोकल्याद्वारे पसरतो. म्हणून वेळेत निदान होण्यासाठी (National Tuberculosis Day) रुग्णांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. संशयित रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्यांची तसेच छातीचे एक्स-रे काढून तपासणी करण्यात येते. क्षयरोग आजाराचे निदान झाले तर त्यांना डॉट्स औषधी सुरू केली जाते.

क्षयरोगाची लक्षणे -
दोन किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येणे
रक्त किंवा श्लेष्माशी संबंधित खोकला
छातीत दुखणे, किंवा श्वास घेताना किंवा खोकताना वेदना होणे
अनावधानाने वजन कमी होणे
थकवा (सामान्यीकृत अशक्तपणा)
ताप (सहसा 60-85% रुग्णांमध्ये)
रात्री घाम येणे (झोपेच्या वेळी खूप घाम येणे)
थंडी वाजून येणे ही लक्षणे आढळून येतात. असे आरोग्य शिक्षण यावेळी कोकळगाव गावातील लोकांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या