Ticker

6/recent/ticker-posts

एसटी कडून आगामी उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार..


चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :- उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतुक करण्यात येते. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

दर वर्षी उन्हाळ्याच्या सुद्दीत दिनांक १५ एप्रिल, २०२५ ते दिनांक १५ जून, २०२५ पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतुक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु सुट्टयांच्यामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेया रद्द करून, त्या ऐवजी लांब पल्ल्याच्या : फेऱ्या सुरू केल्या जातात

उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दीत होणाऱ्या मार्गावर दि.१५ एप्रिल, २०२५ पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गावरील ७६४ जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली असून, या जादा फे-यांदारे दैनंदिन ५२१ नियतांव्दारे २.५० लाख किमी चालविण्यात येणार आहे.

उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, यासाठी रा.प. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर व npublic.msrtcors.com या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपव्दारे या बरोबरच रा.प. महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविध उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी, प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रा.प. महामंडळाव्दारे करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या