Ticker

6/recent/ticker-posts

संतोष उर्फ विकी श्रीवास्तव यांचे निधन

चित्रा न्युज प्रतिनिधी
 मुंबई :-रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे सख्खे मेहुणे संतोष उर्फ विकी श्रीवास्तव यांचे आज दि.27 मार्च 2025 रोजी पहाटे अल्पशा आजाराने वयाच्या  50 व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज बांद्रा पूर्व खेरवाडी येथील स्मशानभूमीत दिवंगत संतोष उर्फ विकी श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता  अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी  ना. रामदास आठवले; सौ सीमाताई आठवले  सर्व आठवले आणि श्रीवास्तव परिवार उपस्थित होते.रिपब्लिकन कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
दिवंगत संतोष उर्फ विकी श्रीवास्तव हे सौ सीमाताई आठवले यांचे सख्खे भाऊ आहेत.ना.रामदास आठवले यांचे मेहुणे होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.
दिवंगत संतोष उर्फ विकी श्रीवास्तव यांचा जलदान विधी आणि जाहीर शोकसभा येत्या दि.3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बांद्रा पूर्व जेड गार्डन जवळ केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या कार्यालया समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी यावेळी जाहीर केले.दिवंगत संतोष उर्फ विकी श्रीवास्तव यांच्या अंत्ययात्रेत अनेक मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या