Ticker

6/recent/ticker-posts

शेवटच्या भावाला जोपर्यंत दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही-शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

हायकोर्टाच्या आदेशाने राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण शिवरस्त्याची रोव्हरद्वारे मोजणी सुरू


चित्रा न्युज प्रतिनिधी
अहिल्यानगर:- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण शिवरस्त्यापासुन सुरू झालेला महाराष्ट्र राज्य  शिव पानंद शेतरस्ता चळवळीचा लढा प्रशासकीय संघर्षातुन न्याय न मिळाल्याने ॲड.प्रतिक्षा काळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली ॲड. प्रतिक्षा काळे यांनी शेतकऱ्यांची प्रभावीपणे बाजू मांडत याठिकाणी  शेतकऱ्यांना मोठे यश प्राप्त झाले यावेळी हायकोर्टाने ६० दिवसात शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीचे आदेश तहसिलला देण्यात आले परंतु तहसिल कार्यालयाकडून पुन्हा झालेली दिरंगाई पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने पारनेर तहसिलदारांविरोधात अवमान याचिका दाखल केली त्याबरोबर पिढ्यान पिढ्या प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष संपावा या उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांची या संघर्षातुन सुटका करण्यासाठी पुढच्या पिढीला न्याय देण्यासाठी राज्यव्यापी जनजागृती जनआंदोलन, प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष महाराष्ट्र शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून करण्यात ठेवत शासनिर्णयाची अंमलबजावणी,पेरू वाटप आंदोलन, ग्रामप्रशासन ,तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासनासह, राज्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करत सरकार प्रशासणाचे चळवळीच्या माध्यमातून लक्ष वेधत राज्य सरकारला राज्यातल्या गावनकाशावरील सर्व शिवपानंद शेतरस्त्त्यांच्या हद्द निश्चित कराव्यात,वहिवाटीच्या सर्व शेतरस्त्यांना गाव नकाशावर घ्यावे, शिव पानंद,सर्वेनंबर, गाडीमार्ग, पायमार्ग आदी सर्वच शेतरस्त्यांच्या लांबी रुंदी नकाशावर घेवुन प्रत्येक रस्त्याला नंबरी लावावेत त्यांचे विशिष्ट मुदतीत सातत्याने सर्वेक्षण व्हावे नंबरी हटवणारांना दंड सुरू करून कायदेशिर कारवाई व्हावी व दर्जेदार शेतरस्ते शेतकऱ्यांना मिळावेत, तहसिलसह, प्रांत कार्यालयातील प्रलंबित रस्ता केसेस तातडीने निकाली काढाव्यात, वाटपत्रात शेतरस्ता नमुद केल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करू नये शारूननिर्णया प्रमाणे मोजणी शुल्क ,संरक्षणफी आकारू नये आदी २१ मागण्या सरकारकडे चळवळीच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत त्याबरोबर मुंबई आझाद मैदानावर २१ एप्रिलला धरणे आंदोलन,२२ एप्रिलला जलत्याग करत लाक्षणिक उपोषण आंदोलन चळवळीच्या माध्यमातून करण्याचा ईशारा चळवळीच्या माध्यामातुन दिला असताना  दरम्यानच्या काळातच सदर राळेगणसिद्धी नारायणगव्हाण शिवरस्त्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे सदर शिवरस्त्याची मोजणी सुरू केली असुन लवकरच हद्द निश्चिती करून शिवरस्ता खुला करण्याचे आश्वासन तालुका प्रशासनाने दिले आहे पारनेर भुमिअभिलेखचे उपधीक्षक माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका भुमिअभिलेखचे अविनाश ठोकळ ,किरण हराळ,संदिप भोसले यांनी मोजणी सुरू केली  यावेळी तलाठी भाऊसाहेब बढे, अमोल सरकाळे, महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, शिरूर कृती समितीचे शांताराम पानमंद,दत्तात्रय बांगर,भाऊसाहेब गाजरे  कांतीलाल औटी रुपेश फटांगडे सोमनाथ फटांगडे गोपीनाथ औटी रामदास फटांगडे रोहित फटांगडे मच्छिंद्र औटी निलेश औटी सिताराम गाजरे विलास औटी शिवाजी मापारी बजरंग औटी बाबुराव कळमकर नितीनभैय्या शेळके अनिल उगले संपत उगले हौशिराम कुदळे दसरे सर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवळे/राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या