Ticker

6/recent/ticker-posts

आला उन्हाळा , कानशिळं सांभाळा.

***************************

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उन्हांचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे आरोग्य प्रशासन अन् तज्ञ मंडळी उन्हांपासून बचावासाठी कांही टिप्स देतात.तर घराघरातील वयस्कर,जुणीजाणती मंडळी आला उन्हाळा पोरांनो कानशीळं सांभाळा, असा सल्ला उन्हात घराबाहेर पडत असलेल्या नातवंडाना देतात.आणि वडीलधा-यांच्या या सल्ल्याचा मना- पासून अनेकजण स्विकार करताना व हातरुमाल,उपरण्याने कानशीळ व डोकं झाकुन घेऊन प्रवास करताना व शेताकडे जाताना दिसतात.
सध्या हंडरगुळी व परिसरात सर्यदेव आग ओकत असल्यासारखे कडक ऊन पडत असून,भर दुपारी मार्केट व गल्लीबोळ निर्मनुष्य दिसतात.गावात अघोषीत "कर्फ्यू" लागल्यासारखे सध्या वातावरण दिसत आहे.हाळी हंडरगुळी,मोरतळवाडी,चिमाचीवाडी सुकणी आदी गावातील शेतकरी शेतीकामे उन्हाचा चटका वाढण्या— पुर्वीच संपवुन दु.१२ च्या आत घरी परतताना दिसतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या