Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त सत्यभामा पंढरपूरकर यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम दारेफळ येथे घेण्यात आला




श्रीकांत बारहाते   जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली

हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथे दिनांक 8/3/2025 रोजी संपन्न झाला जि.प. प्रा.शाळा दारेफळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त सत्यभामा बाई पंढरपूरकर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यांमधील लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे या दृष्टीने विविध लोककला कार्यक्रमाचे आयोजन जि.प.प्रा.शाळा दारेफळ येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार सेलुकर उद्धघाटक राजाभाऊ भालेराव मा.संचालक पुर्णा सा.कारखाना व शाळा समिती अध्यक्ष मारोती भालेराव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आले नंतर महाराष्ट्राची लोककला लावणी सादर करण्यात आली या कार्यक्रमात बालकलाकार प्रसाद शेळके व गौरव शेळके यांनी आपल्या पारंपरिक संबळ वाद्ये वाजवून लोकांना मंत्रमुग्ध केले व भिमशाहिर कवि गायक उतम वंजारे यांनी पहाडी आवाजात पोवाडयाचे सादरीकरण केले व सर्वाचे मन जिंकले तसेच सुभाष पांचाळ यांनी भारुड सादर करून रसिकांचे मनोरंजन केले तसेच शाळेतील विद्यार्थीनी सावित्रीच्या लेकी यावर नाटीका सादर केले व सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.केशव खटिग सर सुप्रसिद्ध कवी व मंगेश जाधव सर वसमत हे उपस्थित होते सुप्रसिद्ध कवी केशव खटिग सर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देवुन गावातील महिलांना त्यांनी महत्त्वपूर्ण महिला चे महत्व पटवून सांगितले व त्यांनी त्यांच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकले या कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी शहाजी चापके यादवराव पाटील सचिन भस्के सावता सारंग व संगीता राठोड यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव बोडेवार यांनी केले व आभार प्रदर्शन राघोजी कुरुडे सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या